Tuesday, January 6, 2026
Homeब्रेकिंग न्यूजMaharashtra Election News : बारामतीसह २४ नगरपालिका, नगरपंचायतींच्या निवडणुका स्थगित; १५४ जागांसाठी...

Maharashtra Election News : बारामतीसह २४ नगरपालिका, नगरपंचायतींच्या निवडणुका स्थगित; १५४ जागांसाठी २० डिसेंबरला होणार मतदान  

राज्य निवडणूक आयोगाची माहिती

मुंबई | प्रतिनिधी | Mumbai

नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत (Nagarpalik and Nagarpanchyat Election) निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरुद्ध जिल्हा न्यायालयात अपिल दाखल झालेल्या प्रकरणांमुळे राज्य निवडणूक आयोगाला बारामती, अंबरनाथसह राज्यातील २४ नगरपालिका, नगरपंचायतींच्या निवडणुका स्थगित कराव्या लागल्या आहेत. याशिवाय ७६ नगरपालिका, नगरपंचायतीमधील नगरसेवक पदाच्या १५४ जागांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. सुधारित कार्यक्रमानुसार आता याठिकाणी २० डिसेंबर २०२५ रोजी मतदान होईल.  

- Advertisement -

राज्य निवडणूक आयोगाने (State Election Commission) ४ नोव्हेंबर २०२५ रोजी राज्यातील २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला होता. आता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरुद्ध अपिल असलेल्या प्रकरणांचा निर्णय २३ नोव्हेंबर २०२५ रोजी किंवा त्यानंतर आल्याने संबंधित ठिकाणी सुधारित कार्यक्रमाप्रमाणे निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. अध्यक्षपदासंदर्भातील अपिलांचा निकाल उशिरा आलेल्या नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या संपूर्ण क्षेत्रासाठी निवडणूक प्रक्रिया सुधारीत कार्यक्रमानुसार राबविली जाईल.

YouTube video player

अध्यक्षपदासोबतच सदस्यपदांची एकत्रित निवडणूक घेण्याची कायद्यात तरतूद आहे. ज्या ठिकाणच्या सदस्यपदासाठी अपिल होते, तिथे मात्र फक्त त्या जागेपुरताच सुधारित निवडणूक कार्यक्रम राबविला जाईल. अपिल कालावधीनंतरच्या टप्प्यांसाठीच्या सुधारित कार्यक्रमानुसार आता १० डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची अंतिम यादी आणि निवडणूक चिन्हांचे वाटप ११ डिसेंबर २०२५ रोजी होईल. २० डिसेंबरला सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होईल. मतमोजणी २१ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता सुरू होईल.


अनगरसाठी पुन्हा निवडणूक

राज्य निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार सोलापूर जिल्ह्यातील अनगर नगरपंचायतीसाठी पुन्हा निवडणूक पार पडणार आहे. या नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजपचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार बिनविरोध निवडून आल्याचे स्पष्ट झाल्यानंतर भाजपमध्ये अलीकडेच प्रवेश केलेले माजी आमदार राजन पाटील आणि त्यांच्या समर्थकांनी मोठा जल्लोष केला होता. आयोगाच्या निर्णयाने भाजपचा जल्लोष क्षणभंगुर ठरला आहे.

अध्यक्षपदांसह सर्व सदस्यपदांसाठी सुधारित कार्यक्रमानुसार निवडणूक होत असलेल्या २४ नगरपालिका आणि  नगरपंचायतींची जिल्हानिहाय माहिती

ठाणे : अंबरनाथ
अहिल्यानगर : कोपरगाव, देवळाली -प्रवरा, पाथर्डी आणि  नेवासा.
पुणे: बारामती आणि फुरसुंगी- उरुळी देवाची.
सोलापूर : अनगर, मंगळवेढा
सातारा : महाबळेश्वर, फलटण
छत्रपती संभाजीनगर : फुलंब्री
नांदेड : मुखेड, धर्माबाद
लातूर:  निलंगा, रेणापूर
हिंगोली- बसमत
अमरावती: अंजनगाव सूर्जी,
अकोला: बाळापूर
यवतमाळ: यवतमाळ
वाशिम : वाशिम
बुलढाणा: देऊळगावराजा
 वर्धा: देवळी
 चंद्रपूर : घुग्घूस

ताज्या बातम्या

Nashik News : कट चहा ५, कॉफी १२ तर मिसळपाव ‘इतक्या’...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik नाशिक महापालिका सार्वत्रिक निवडणूक (Nashik Municipal Corporation) २०२६ च्या पार्श्वभूमीवर उमेदवारांच्या निवडणूक खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकेने स्थानिक प्रचलित दरांची यादी...