Wednesday, May 8, 2024
Homeमुख्य बातम्याविधान परिषद निवडणूक बिनविरोध नाहीच! १० जागांसाठी ११ उमेदवार मैदानात

विधान परिषद निवडणूक बिनविरोध नाहीच! १० जागांसाठी ११ उमेदवार मैदानात

मुंबई | Mumbai

विधान परिषदेच्या दहा जागांसाठी २० जून रोजी मतदान होणार आहे. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता.

- Advertisement -

दरम्यान विधानपरिषदेच्या १० जागांसाठी ११ उमेदवारांचे अर्ज कायम राहिल्यानं निवडणूक होणार हे स्पष्ट झालं आहे. दरम्यान आज अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शिवाजीराव गर्जे यांचा अर्ज मागे घेण्यात आला.

भाजपचे ५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे प्रत्येकी दोन असे ११ उमेदवार रिंगणात आहेत. शिवसेनेनं विधानपरिषद निवडणुकीसाठी सचिन अहिर आणि आमश्या पाडवी यांना उमदेवारी दिली आहे.

तर राष्ट्रवादी काँग्रेसनं एकनाथ खडसे आणि रामराजे नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसकडून भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या