मुंबई | Mumbai
महायुतीमध्ये (Mahayuti) गेल्या काही दिवसांपासून नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदावरुन जुंपल्याचे पाहायला मिळत आहे. यात नाशिकमध्ये शिवसेनेचे मंत्री दादा भुसे आणि भाजपच्या गिरीश महाजन यांच्यात पालकमंत्रीपदावरून वाद आहे. तर रायगडमध्ये पालकमंत्रीपदावरुन शिवसेनेच्या (Shivsena) भरत गोगावले (Bharat Gogawale) आणि राष्ट्रवादीच्या मंत्री अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांच्यात संघर्ष सुरु आहे. त्यामुळे या दोन्ही जिल्ह्यांचा पालकमंत्रीपदाचा तिढा अद्याप सुटलेला नाही.
अशातच आता १५ ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्यदिनी कुठल्या जिल्ह्यात कोणता मंत्री (Ministers) ध्वजारोहण करणार याबाबतचा निर्णय राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाकडून एका यादीद्वारे (List) जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार नाशिकमध्ये मंत्री गिरीश महाजन तर रायगडमध्ये मंत्री अदिती तटकरे ध्वजारोहण (Flag Hosting) करणार आहेत.
तसेच बीडमध्ये उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याहस्ते ध्वजारोहण केले जाणार आहे. तर पुणे येथे राज्यपालांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडणार आहे. पालकमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर अजित पवार पहिल्यांदाच ध्वजारोहणसोहळ्यासाठी बीडला जाणार आहेत. तर इतर जिल्ह्यात त्या-त्या जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे.
ध्वजारोहण करण्यात येणाऱ्या जिल्ह्याचे नाव आणि मंत्र्यांची यादी
1 एकनाथ गंगुबाई संभाजी शिंदे – ठाणे
2 अजित आशाताई अनंतराव पवार – बीड
3 चंद्रशेखर प्रभावती कृष्णराव बावनकुळे – नागपूर
4 राधाकृष्ण सिंधुताई एकनाथराव विखेपाटील -अहिल्यानगर
5 छगन चंद्रभागा चंद्रकांत भुजबळ – गोंदिया
6 चंद्रकांत (दादा) सरस्वती बच्चु पाटील -सांगली
7 गिरीश गिता दत्तात्रय महाजन – नाशिक
8 गणेश सुभद्रा रामचंद्र नाईक – पालघर
9 गुलाबराव रेवाबाई रघुनाथ पाटील – जळगांव
10 दादाजी रेश्माबाई दगडू भुसे – अमरावती
11 संजय प्रमीला दुलिचंद राठोड – यवतमाळ
12 उदय स्वरुपा रविंद्र सामंत – रत्नागिरी
13 जयकुमार नयनकुवर जितेंद्रसिंह रावल – धुळे
14 पंकजा प्रज्ञा गोपीनाथ मुंडे – जालना
15 अतुल लिलावती मोरेश्वर सावे – नांदेड
16 डॉ. अशोक जनाबाई रामाजी वुईके – चंद्रपूर
17 शंभुराज विजयादेवी शिवाजीराव देसाई -सातारा
18 अॅङ आशिष मिनल बाबाजी शेलार- मुंबई उपनगर
19 दत्तात्रय गिरीजाबाई विठोबा भरणे -वाशिम
20 आदिती वरदा सुनिल तटकरे – रायगड
21 शिवेंद्रसिंह अरुणाराजे अभयसिंहराजे भोसले – लातूर
22 माणिकराव सरस्वती शिवाजी कोकाटे – नंदुरबार
23 जयकुमार कमल भगवानराव गोरे – सोलापूर
24 नरहरी सावित्रिबाई सिताराम झिरवाळ – हिंगोली
25 संजय सुशिला वामन सावकारे – भंडारा
26 संजय शकुंतला पांडूरंग शिरसाट – छत्रपती संभाजीनगर
27 प्रताप इंदिराबाई बाबुराव सरनाईक – धाराशिव
28 मकरंद सुमन लक्ष्मणराव जाधव (पाटील) – बुलढाणा
29 नितेश निलम नारायण राणे – सिंधुदुर्ग
30 आकाश सुनिता पांडूरंग फुंडकर – अकोला
31 प्रकाश सुशिला आनंदराव आबिटकर – कोल्हापूर
32 अॅङ आशिष उमादेवी नंदकिशोर जयस्वाल – गडचिरोली
33 डॉ. पंकज कांचन राजेश भोयर – वर्धा
34 मेघना दिपक साकोरे-बोर्डीकर – परभणी





