मुंबई | प्रतिनिधी | Mumbai
राज्यात नाशिक, अहमदनगर जिल्ह्यासह चार जिल्ह्यात नवीन एमआयडीसी (New MIDC) स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यासंदर्भात परिपूर्ण प्रस्ताव तातडीने सादर करावेत तसेच राज्यात यापुढे नवीन ‘एमआयडीसी’ उभारण्यासाठी किमान १०० एकर जमिनीची उपलब्धता करुन द्यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिले. याशिवाय पुणे जिल्ह्यातील डुंबरवाडी (ता. जुन्नर) येथे राज्यासह केंद्राच्या विविध योजनांच्या माध्यमातून फूड प्रोसेसिंग पार्क उभारण्यासाठी सरकार सकारात्मक असल्याचेही त्यांनी सांगितले.
हे देखील वाचा : गणपतीसाठी कोकणात एसटीच्या धावणार ‘इतक्या’ जादा बसेस
अजित पवार यांनी आज मंत्रालयात एमआयडीसीच्या संदर्भात आढावा घेतला. यावेळी बोलताना पवार यांनी नव्या एमआयडीसी स्थापन करण्याबाबत प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या राज्याच्या विकासात उद्योगांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. राज्याच्या उत्पन्न वाढीसाठी तसेच रोजगार निर्मितीसाठी उद्योगांना चालना देण्याची सरकारची भूमिका आहे. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज (वडसा), अहमदनगर जिल्ह्यातील लिंगदेव, अकोले, नाशिक जिल्ह्यातील कळवण-सुरगाणा एमआयडीसी (Kalwan-Surgana MIDC) बरोबरच जांबुटके (ता. दिंडोरी) येथील आदिवासी औद्योगिक समूह विकास योजना तसेच अमरावती जिल्ह्यातील वरुड येथे ‘एमआयडीसी’ उभारण्यासाठीचे सविस्तर प्रस्ताव तातडीने सादर करा. एमआयडीसीच्या उभारणीसाठी किमान १०० एकर जमिनीची उपलब्धता असणे आवश्यक आहे. किमान १०० एकर जमीन उपलब्ध असेल तरच सर्वसोयींनीयुक्त एमआयडीसी उभी राहू शकते. त्यामुळे यापुढे एमआयडीसी मंजूर करताना किमान शंभर एकर जमिनीची उपलब्धता असणे आवश्यक आहे, असे पवार यांनी स्पष्ट केले.
हे देखील वाचा : Uddhav Thackeray : “एक तर तू राहशील नाहीतर मी”; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना गर्भित इशारा
दरम्यान, या बैठकीला उद्योगमंत्री उदय सामंत, अन्न आणि औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम, आमदार किरण लहामटे, देवेंद्र भुयार, दिलीप मोहिते-पाटील, अतुल बेनके (व्हिसीद्वारे), आमदार नितीन पवार (व्हिसीद्वारे), नियोजन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजगोपाल देवरा, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार, वित्त विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपिन शर्मा यांच्यासह संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त व्हिसीद्वारे उपस्थित होते.
हे देखील वाचा : Yashashri Shinde Murder Case : आरोपी दाऊद शेखला पोलीस कोठडी; हत्येचे कारणही सांगितलं
प्रास्तवित नवी एमआयडीसी
नाशिक : कळवण-सुरगाणा
नगर : लिंगदेव, अकोले
अमरावती : वरुड
गडचिरोली : देसाईगंज (वडसा)
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा