Thursday, September 19, 2024
Homeदेश विदेशदेशातले 53 टक्के करोना रुग्ण महाराष्ट्र आणि केरळमध्ये

देशातले 53 टक्के करोना रुग्ण महाराष्ट्र आणि केरळमध्ये

नवी दिल्ली / New Delhi – देशातील काही भागात अद्यापही करोनाची दुसरी लाट असल्याचे आढळून आले आहे. महाराष्ट्र (Maharashtra) आणि केरळ (Kerala) या दोन राज्यांमध्ये देशातील निम्म्याहून अधिक करोना रुग्ण आहेत, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी सांगितले आहे. केरळातील 14 आणि महाराष्ट्रातील 15 जिल्ह्यांमध्ये चिंताजनक परिस्थिती आहे असेही आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. गेल्या आठवड्यातील आकडेवारीच्या आधारे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने हि माहिती दिली आहे.

- Advertisement -

आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव्ह अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले, करोनाची दुसरी लाट अद्याप संपलेली नाही. हा विषाणू अजूनही आहे. अशा परिस्थितीत, आपण निष्काळजीपणाने करोना प्रोटोकॉलचे उल्लंघन करणे धोकादायक ठरणार आहे.

गेल्या आठवड्यात भारतात आढळून आलेल्या करोनाबाधितांपैकी निम्म्याहून अधिक म्हणजेच 53 टक्के बाधित हे महाराष्ट्र आणि केरळमध्ये आढळले आहेत. करोनाचे संकट अद्याप टळलेले नाही. देश अजूनही दुसर्‍या लाटेसोबत लढत आहे आणि आपल्याला आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे, कारण आपल्याला वाटत आहेत की कोविड-19 संपला आहे.

करोना प्रोटोकॉलचे पालन करण्यावर भर देताना ते म्हणाले की रशिया, बांगलादेश आणि ब्रिटनच्या उदाहरणावरून आपल्याला शिकायला हवे, तिथे रुग्ण संख्या पुन्हा एकदा वाढू लागली आहेत. अग्रवाल म्हणाले की नुकतीच ब्रिटनमध्ये युरो चषक 2020 चे आयोजन करण्यात आले होते आणि लोक फुटबॉल सामन्यांचा आनंद घेत होते. पण तिथे आता पुन्हा एकदा करोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या