Wednesday, November 20, 2024
Homeनाशिकमहारष्ट्र केसरीची अंतिम लढत : …तर होईल नाशिक, अकोल्याचा सन्मान; नाशिककरांच्या नजरा...

महारष्ट्र केसरीची अंतिम लढत : …तर होईल नाशिक, अकोल्याचा सन्मान; नाशिककरांच्या नजरा हर्षवर्धनच्या खेळीकडे

नाशिक | प्रतिनिधी 

नगर जिल्ह्यातील अकोले येथील व सध्या नाशिक जिल्ह्यातील हरसूल महाविद्यालयाचा विद्यार्थी असलेला हर्षवर्धन सदगीरला महाराष्ट्र केसरीची चांदीची गदा मिळविण्याची सुवर्णसंधी आहे. सदगीर चांगली खेळी करेल आणि नाशिकसह अकोल्याला पहिला महाराष्ट्र केसरी होण्याचा मान मिळेल अशी आशा नाशिककरांना आहे.

- Advertisement -

हर्षवर्धनला लहानपणापासूनच कुस्तीची आवड असल्याने त्याने लहानपणापासून कुस्तीचे धडे घ्यायला सुरुवात केली. भगूर येथे हर्षवर्धन वास्त्यव्यास असून येथील गोरख बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने अखिल भारतीय हरियाणा येथे स्पर्धा सीसार, पुणे गटाकडून प्रतिनिधित्व केले आहे. या स्पर्धेत सुवर्णपदकही त्याने मिळवले.

त्याने गेल्या दोन-तीन वर्षांपासून महारष्ट्र केसरीसाठी प्रयत्न सुरु केले होते. पुरेसे प्रशिक्षण पुणे येथील काका पवार यांच्या अकादमीत त्यांनी कुस्तीचे धडे घेतले.  २०१२ पासून राज्यस्तरावर खेळतो आहे.

नुकतीच हर्षवर्धनने महाराष्ट्र केसरीच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. त्यामुळे नाशिकसह अकोल्याला पहिला महाराष्ट्र केसरी मिळण्याची शक्यता आहे.

नाशिकमध्ये याआधी येवल्याचे राजू लोणारी यांनी महाराष्ट्र केसरीच्या अंतिम फेरीत धडक मारली होती,. मात्र, त्यानंतर नाशिक मात्र महाराष्ट्र् केसरी स्पर्धेपासून दूर राहिले होते. यंदा पहिले विजेतेपद मिळवून हर्षवर्धनने इतिहास घडवावा अशी आशा नाशिककरांना आहे.

काल हर्षवर्धनने माजी महाराष्ट्र केसरी अभिजित कटके यास नमवत अंतिम फेरी गाठली. हर्षवर्धन सध्या नाशिक जिल्ह्यातील व पेठ तालुक्यातील करंजाळी येथील महाविद्यालयात पदवीचे शिक्षण घेत आहे. २०१४ साली हर्षवर्धनने उत्तर महाराष्ट्र श्री या स्पर्धेत उपविजेता ठरला होता.

तोपर्यंत त्याने नाशिकमध्येच प्रशिक्षण घेतले होते. मात्र वयानुसार वजनदेखील वाढले असल्याने पुढील शिक्षणासाठी हर्षवर्धन पुण्याला अकादमीत प्रवेश घेतला. गेल्या दोन-तीन वर्षांपासून महारष्ट्र केसरीसाठी प्रयत्न सुरु केले होते. पुरेसे प्रशिक्षण पुणे येथील काका पवार यांच्या अकादमीत त्यांनी कुस्तीचे धडे घेत आहे.

कोन्हीही जिंकू देत चांदीची ‘गदा’ काका पवारांच्या अकादमीत

आज महाराष्ट्र केसरीची अंतिम लढत पार पडणार आहे. संपूर्ण कुस्तीगीरांसह राज्याची नजर या लढतीकडे लागली आहे. दोन्हीही कुस्तीगीर पुण्यातील काका पवार यांच्या तालमीतील मल्ल आहेत. त्यामुळे दोघांमध्ये स्पर्धा होत असली तरीही जो कुणी या स्पर्धेत बाजी मारली त्याला चांदीची मानाची गदा दिली जाणार आहे. त्यामुळे गदा काका पवार यांच्या तालमीतच येणार असल्याचे पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या