Thursday, March 13, 2025
Homeब्रेकिंग न्यूजShivraj Rakshe: "खेळाडूवर अन्याय होत राहिला तर…"; निलंबनानंतर शिवराज राक्षेची प्रतिक्रिया

Shivraj Rakshe: “खेळाडूवर अन्याय होत राहिला तर…”; निलंबनानंतर शिवराज राक्षेची प्रतिक्रिया

मुंबई । Mumbai

२ फेब्रुवारीला अहिल्यानगरमध्ये झालेल्या महाराष्ट्र केसरीच्या उपांत्य आणि अंतिम फेरीत मोठा गोंधळ पाहायला मिळाला. पुण्याचा पैलवान पृथ्वीराज मोहोळ यंदाचा महाराष्ट्र केसरी ठरला आहे.

- Advertisement -

पृथ्वीराज मोहोळने उपांत्य फेरीत पैलवान शिवराज राक्षे आणि अंतिम फेरीत पैलवान महेंद्र गायकवाड यांच्यावर विजय मात करत मानाची गदा पटकावली. पण या दोन्ही फेरीच्या सामन्यांमध्ये मोठा वाद निर्माण झाला. अंतिम सामन्यानंतर पंचांशी हुज्जत घातल्याप्रकरणी आणि गैरवर्तनासाठी पैलवान शिवराज राक्षे आणि पैलवान महेंद्र गायकवाड यांना कुस्तीगीर परिषदेने तीन वर्षांसाठी निलंबित केलं आहे. दोन्ही पैलवानांवर करण्यात आलेल्या या कारवाईवरुन राज्यभर क्रीडा वर्तुळात उलटसुलट चर्चा रंगू लागल्या आहेत.

या सगळ्यात एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शिवराज राक्षेनेही आपली भूमिका मांडली आहे. “आमच्यावरील कारवाई चुकीची आहे. हे सर्वांनी पाहिल आहे. कुस्तू झाली त्यावेळी आम्ही पंचांकडे व्हिडीओ पाहून निर्णय घेण्यची मागणी केली होती. त्याआधी ते निर्णय घेऊ शकत नाही. त्यांनाही तसा अधिकार नाही. आम्ही तिथे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि संयोजकांकडेही व्हिडीओ दाखवण्याची आणि त्यानुसार निर्णय घेण्याची मागणी केली. जर दोन्ही खांदे टेकले असतील तर मी हार मानायला तयार आहे. कुस्तीत हारजीत होत असते, त्याबद्दल शंका नाही. पण पंचाच्या चुकीच्या निर्णयामुळे खेळाडूवर अन्याय होत असेल तर पंचांवरही कारवाई व्हायला हवी, असं शिवराज राक्षेने म्हटलं आहे. तसेच त्यांच्या बाजूचा मीडियाद्वारेही हा निर्णय चुकीचा असल्याचे सांगण्यात आले होते, त्यावेळीही व्हिडीओ दाखवून पंचाचा निर्णय चूक आहे की बरोबर हे स्पष्ट का केलं नाही”, असा प्रश्नही शिवराजने उपस्थित केला.

निलंबनाच्या कारवाईनंतर शिवराज राक्षे यांच्या कुटुंबियांनी गंभीर आरोप केले आहेत. पंचांना समजायल हवं होतं, असा निर्णय घ्यायला नको होता. त्यांनी नंतर चुकी मान्य केली, त्यावेळी रिव्ह्यू दाखवला असता तर ही वेळ आली नसती. माझा मुलगा असा करणार नाही गॅरंटी आहे. त्याने १०- ० ने सर्व कुस्त्या काढल्या अन् त्यांनी खोटा निर्णय दिला, त्यांनी रिव्ह्यू दाखवला नाही त्यामुळे कोणीपण चिडणार. मॅटवर जाताना शिवराजला शिवीगाळ केली, असं नव्हतं करायला हवं. निलंबित करणं म्हणजे गरिबाच्या मुलावर अन्याय केला. आमचं मत आहे की पंचांनाही शिक्षा द्या. आमचंही गरीब घरातील कुटुंब आहे. दुध व्यवसायातून आम्ही त्याला घडवलं आहे. तुम्ही असा ठोक निर्णय का घेता? फक्त मुलांनाच नाहीतर पंचांनाही शिक्षा द्या. सगळी खेळणारी मुलं गरीब घरातीलच असतात, अशी मागणी शिवराजच्या आईने केली आहे.

आमचं संपुर्ण कुटुंब शिवराज यांच्या पाठिशी आहे. १५ वर्ष त्यांनी त्याग केलाय आणि आता अन्याय करून परत बंदी घालत आहे. दोन दिवसांपूर्वी पंचांनी टार्गेट करून काहीना काही बोलत होते. न्याय मागायल गेल्यावर शिवी दिली होती. आता मान्य करताय की इतक्या कुस्त्या त्याने १०-० ने काढल्या, यांनी रिव्ह्यू दाखवायला हवा होता. पंचांनी दिलेला निर्णय चुकीचा निर्णय होता तर मग आता आम्हालाही न्याय हवा आहे. पंचांवरही कारवाई झाली पाहिजे. जेव्हा अशी परिस्थिती असेल कोणताही पैलवान शांत बसणार नाही, अशी प्रतिक्रिया शिवराज राक्षे याच्या वहिनींनी दिली आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : कृष्णा आंधळे नाशकात दिसला? दीड महिन्यांनी पुन्हा नागरिकांचा...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik बीड जिल्ह्यातील (Beed District) मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील मुख्य संशयित कृष्णा आंधळे (Krishna Andhale) तीन महिन्यांपासून...