Friday, March 28, 2025
Homeब्रेकिंग न्यूज'महानंदचे' NDDB ला हस्तांतरण पुर्ण; गुजरातच्या मदर डेअरीने घेतला ताबा

‘महानंदचे’ NDDB ला हस्तांतरण पुर्ण; गुजरातच्या मदर डेअरीने घेतला ताबा

मुंबई | Mumbai
महानंद डेअरीवरुन मागच्या काही दिवसांपासून विरोधकांनी शिंदे सरकारवर टिकास्र सोडले होते. इतर उद्योगाप्रमाणे महानंद डेअरी देखील गुजरातला हलवण्याचा घाट घातला जातोय, असा आरोप केला होता. त्यानंतर आता ‘महानंद’बाबत वृत्त येत आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ म्हणजे महानंद डेअरी इतिहास जमा झाली आहे. महाराष्ट्रातील या प्रसिद्ध डेअरीवर गुजरातच्या मदर डेअरीने ताबा मिळवला आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या काळात विरोधकांना सरकारविरुध्द टीकेचे मुद्दा मिळण्याची शक्यता आहे.

गुजरातस्थित असलेल्या मदर डेअरीने महानंद डेअरीचा ताबा मिळवला आहे. महानंद डेअरीची मदर डेअरीला हस्तांतरणाची प्रक्रिया २ मे रोजीच पूर्ण झाली आहे. तसेच मदर डेअरीला राज्य सरकारकडून महानंदच्या पुनरुज्जीवनासाठी २५३ कोटी रुपयांचे अर्थसहाय्य केले जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

- Advertisement -

मुंबईतल्या गोरेगाव येथे असलेली महानंदा डेअरी तोट्यात असल्यामुळे राज्य सरकारच्या वतीने एनडीडीबीला कळविण्यात आले होते. त्यानुसार राज्य सरकारने आता नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड यांच्याबरोबर करार करून महानंदा डेअरीचा ताबा मदर डेअरीला दिला आहे. एकूण पाच वर्षांसाठी हा करार करण्यात आला आहे.

महानंदच्या संचालक मंडळाने महानंदला नॅशनल डेअरी डेव्हलेपमेंट बोर्डाला चालवायला देण्याचा निर्णय घेतला होता. त्याला राज्य सरकारने मंजुरी दिली होती. मात्र गुजरातसाठी पायघड्या घालायचा म्हणून हा निर्णय घेतला जातोय असा आरोप किसान महासभेने केला होता. त्यातच ज्यातील उद्योग राज्याबाहेर जात असताना आता दूध व्यवसायही राज्याबाहेर चालवायला द्यायचा का असाही आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला होता.

महानंद ही राज्यातील शिखर संस्था होती. ती गेल्या काही काळापासून आर्थिक डबघाईला आली होती. यामुळे महानंदला गुजरातमधील केंद्र सरकारच्या अधिपत्याखालील नॅशनल डेअरी डेव्हलेपमेंट बोर्डाला चालविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यातच आता ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात राज्य सरकारच्या विरोधात विरोधकांना मुद्दा मिळाल्यामुळे विरोधक सरकारची कोंडी करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Thailand Earthquake: “पुल कोसळले, इमारती पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळल्या, अनेक लोक बेपत्ता...

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhiथायलंडची राजधानी बँकॉकमध्ये शुक्रवारी 7.7 रिश्टर स्केल तीव्रतेचा शक्तीशाली भूकंप झाला. या शक्तीशाली भूकंपानंतर एकच हाहाकार उडाल्याचे पहायला मिळाले....