Monday, May 6, 2024
Homeमुख्य बातम्याबळीराजा संकटात! राज्यात पावसाचा पुन्हा ब्रेक; गणेशाच्या आगमनाला वरुणराजा लावणार हजेरी?

बळीराजा संकटात! राज्यात पावसाचा पुन्हा ब्रेक; गणेशाच्या आगमनाला वरुणराजा लावणार हजेरी?

मुंबई | Mumbai

सप्टेंबरमध्ये पावसाने चांगला जोर धरल्याने बळीराजा सुखावला होता. मात्र, काही दिवस झालेल्या मुसळधार पावसानंतर आता पुन्हा एकदा मान्सूनने (Monsoon) ब्रेक घेतला आहे. ऑगस्ट महिन्यात पावसाने विश्रांती घेतल्यानंतर सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रातील अनेक भागात चांगला पाऊस झाला होता. मात्र, आता पुन्हा एकदा बळीराजाच्या आनंदावर विरजण पडणार आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पाऊस पुन्हा एकदा विश्रांती घेणार आहे.

- Advertisement -

रविवारी १० सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात यलो अलर्ट दिला होता. त्याशिवाय मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यताही हवामान विभागाने वर्तवली होती. त्यानुसार, रविवारपर्यंत मध्य महाराष्ट्र व उत्तर महाराष्ट्रात पाऊस बरसला होता. मात्र, आज ११ सप्टेंबरपासून पावसाने पुन्हा एकदा ब्रेक घेतला आहे. पुढचे तीन दिवस पाऊस विश्रांती घेणार आहे, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

डॉ. होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ सप्टेंबरपासून मध्य भारतातील काही जिल्ह्यांमध्ये मान्सूनचे जोरदार पुनरागमन होण्याची शक्यता आहे. दरम्यान मंगळवारी गणेश चतुर्थी असून गणेशाच्या आगमनाला वरुणराजा हजेरी लावण्याची शक्यता आहे असा अंदाज हवामान विभागाने लावला आहे.

ऑगस्टमध्ये दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रीय झाल्याने बळीराजा सुखावला होता. शेतीच्या कामांना सुरुवात झाली होती. मात्र, आता पुन्ही पुढचे तीन दिवस पाऊस विश्रांती घेणार असल्याचा अंदाज असल्याने बळीराजाच्या चिंतेत पुन्हा वाढ झाली आहे. शेतीची कामे पुन्हा खोळंबणार आहेत.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या