Saturday, April 18, 2026
Homeब्रेकिंग न्यूजDevendra Fadnavis : "...त्यामुळे मनातून चीड होती"; मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली आणीबाणीतील कटू...

Devendra Fadnavis : “…त्यामुळे मनातून चीड होती”; मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली आणीबाणीतील कटू आठवण

नेमकं काय म्हणाले?

मुंबई | Mumbai

देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांनी २५ जून १९७५ रोजी देशात आणीबाणी (Emergency) जाहीर केली होती. त्यांच्या या निर्णयाला आज ५० वर्ष पूर्ण झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी एका वर्तमानपत्रामध्ये आणीबाणीच्या मुद्द्यावर लेख लिहिला आहे. या लेखात त्यांनी आणीबाणीवर टीका करत काही जुन्या कटू आठवणी सांगितल्या आहेत.

- Advertisement -

मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या लेखात म्हटले आहे की,” देशातील एका काळ्याकुट्ट अध्यायाला आज ५० वर्षे झाली. त्याला सुवर्ण महोत्सव म्हणायचे तरी कसे? महोत्सव हा चांगल्याचा करायचा असतो. त्यामुळे संविधान आणि सांविधानिक व्यवस्था आणि लोकशाही पायदळी तुडवणाऱ्या काँग्रेस (Congress) पक्षाने लिहिलेल्या या अध्यायाला ५० वर्षं झाली, एवढेच म्हणावे लागेल. जुने दिवस कधी विसरायचे नसतात, ते सतत आपल्याला लढण्याचे बळ देत असतात. महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जिवंत असताना त्यांचा विचार कधी काँग्रेसने स्वीकारला नाही आणि आणीबाणीत तर त्यांनी दिलेल्या पवित्र संविधानावरच सूड उगवण्याची भूमिका घेतली. तीन लाखांवर लोकांना तुरूंगात टाकण्यात आले होते, अनेक संसार उघड्यावर आले होते. समाजवादी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि जनसंघ या आंदोलनात अग्रणी होते. या आणीबाणीच्या समर्थनार्थ केवळ दोनच पक्ष उभे झाले, त्यातील एक होती भाकप आणि दुसरी शिवसेना. माकपने सुद्धा विरोधी भूमिका घेतली होती. त्यावेळी या आणीबाणीने अनेक कुटुंबांना उद्ध्वस्त केले होते, असे त्यांनी म्हटले आहे.

फडणवीस पुढे आपल्या लेखात म्हणतात, “आणीबाणीत अनेकांनी आपले आप्तस्वकीय गमावले. घरातील (Home) कमावती व्यक्ती कारागृहात असताना अनेक कुटुंबे कर्जबाजारी झाली. त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवले. अनेकांची संपत्ती जप्त झाली, उद्याोग-रोजगार कायमचे संपुष्टात आले. मानसिक आणि आर्थिक अशा दोन्ही पातळ्यांवर मोठे शोषण झाले. माझा वैयक्तिक अनुभव विचाराल, तर मी केवळ पाच वर्षांचा होतो. माझे वडील दि. गंगाधरराव फडणवीस यांनाही अटक झाली होती. त्यांना कारागृहात डबा द्यायला जाताना किंवा त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी नेताना फक्त भेट होत असे. लहान वयात वडीलांपासून बराच काळ दूर राहावे लागले. त्यामुळे मनातून चीड होती”, अशी कटू आठवण त्यांनी सांगितली.

तसेच “आज ऑपरेशन सिंदूरनंतर (Operation Sindoor) काँग्रेसने जी भूमिका घेतली, त्याची त्यांना लाज वाटली पाहिजे. खरे तर आणीबाणीच्या काही काळ आधी पाकिस्तानशी युद्ध झाले होते. त्यावेळी जनसंघ म्हणून इंदिरा गांधींच्या पाठीशी उभे राहण्याची घोषणा अटलबिहारी वाजपेयी यांनी केली. आणीबाणी उठविल्यावर पुन्हा रामलीला मैदानावर जंगी सभा झाली. इंदिरा गांधी मुर्दाबाद, अटलबिहारी वाजपेयी जिंदाबाद, अशा घोषणा निनादल्या. अटलजींनी तो जमाव शांत केला. आणीबाणीनंतर विधिपालिका, कार्यपालिका आणि न्यायपालिका या व्यवस्थांचे महत्त्व अधिक अधोरेखित झाले होते. लोकशाहीचे महत्त्व काय, हे अधिक प्रकर्षाने लोकांना समजले, असेही देवेंद्र फडणवीस लेखात म्हणाले आहेत.

फडणवीस लेखात पुढे म्हणाले की, “गांधी घराणे आणि काँग्रेसने केलेल्या शोषणाच्या कथा जितक्या प्रकर्षाने पुढे येतील, त्यातून लोकशाही अधिक भक्कम होत जाईल. आज आम्ही राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आणीबाणीच्या या विदारक कथा चित्ररूपाने प्रदर्शनातून मांडत आहोत. प्रत्येकाने त्याला अवश्य भेट द्यावी. आणीबाणीत संघर्ष करणाऱ्या कुटुंबांनी, लोकशाहीच्या पुनर्स्थापनेसाठी जो लढा दिला, त्यांचा सन्मानपत्र देऊन गौरवसुद्धा करणार आहोत. त्या कुटुंबांना मानधन देण्याचा निर्णयसुद्धा राज्य सरकारने घेतला आहे. हे आम्ही लोकशाही रक्षणाच्या मंदिरात वाहिलेले पवित्र पुष्प आहे. येणाऱ्या पिढ्यांनी मात्र हा इतिहास (Histroy) आवर्जून समजून घेतला पाहिजे”, असेही म्हटले आहे.

ताज्या बातम्या

डंपरची

Nashik News: सी टू भवन समोर भीषण अपघात; डंपरची अनेक गाड्यांना...

0
नवीन नाशिक | प्रतिनिधीनवीन नाशिक भागातील खुटवड नगर परिसरातील असलेल्या मधुर स्वीट जवळ एका डंपरने अनेक गाड्यांना धडक दिल्याची भीषण घटना घडली. शनिवारी (दि.१८)...