मुंबई | Mumbai
लोकसभेत ‘अँटी पेपर लीक दुरुस्ती विधेयका’वर सुरू असलेल्या चर्चेदरम्यान विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आज (बुधवारी) भाषण केले. यावेळी त्यांनी जंतरमंतर विद्यार्थ्यांवर केलेल्या लाठीचार्जचे आदेश गृहमंत्रालयाने (Home Ministry) पोलिसांना दिल होते, असा गंभीर आरोप केला. यानंतर सत्ताधाऱ्यांनी पुरावा देण्याची मागणी केली. त्यामुळे लोकसभेत प्रचंड गदारोळ झाला. त्यानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी लोकसभेचे कामकाज तहकूब केले. दरम्यान आता यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
यावेळी ते म्हणाले की, “विरोधकांनी प्रशासनातील चुकांवर नक्कीच भाष्य आणि आरोप करावेत, परंतु काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी युवकांच्या (Youth) भल्यासाठी असा कोणता मुद्दा उचलला आहे? त्यांचा एकमेव अजेंडा अराजकता हा असून, त्यांना देशाशी काहीच देणंघेणं नाही, असे फडणवीस यांनी म्हटले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी देशातील तरुणांसाठी अनेक कल्याणकारी निर्णय घेतले असून नुकतेच संमत झालेले ‘परीक्षा गैरव्यवहार विरोधी विधेयक’ (Paper Leak Law) युवकांच्या भविष्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरेल”, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
हे देखील वाचा : Rahul Gandhi : गृहमंत्रालयाने पोलिसांना विद्यार्थ्यांवर कारवाईचे आदेश दिले; राहुल गांधींचा गंभीर आरोप
NEET आंदोलनकर्त्यांवरील गुन्हे मागे घेणार
‘नीट’ (NEET) पेपरफुटीप्रकरणी मुंबईत (Mumbai) आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि कार्यकर्त्यांना मुख्यमंत्र्यांनी मोठा दिलासा दिला आहे. या आंदोलनादरम्यान आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेतले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच महाराष्ट्रात पोलिसांनी या आंदोलनादरम्यान अत्यंत संयमाची भूमिका घेतली होती. त्यामुळे फार गंभीर गुन्हे दाखल झालेले नाहीत. जे काही गुन्हे दाखल झाले आहेत, ते केवळ जमावबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी आहेत त्यामुळे ते लवकरच मागे घेण्यात येतील, असे आश्वासन फडणवीस यांनी दिले.
हे देखील वाचा : Manoj Jarange : २९ ऑगस्टपासून शेवटचे निर्णायक आंदोलन करणार – मनोज जरांगेंचा पुन्हा एल्गार
गडचिरोलीतील नक्षलवादी बॅनर्सवर कडक कारवाईचा इशारा
दरम्यान, गडचिरोली भागात नक्षलवाद्यांच्या नावाने काही ठिकाणी झळकलेल्या बॅनरबाबत विचारले असता यावरही भाष्य केले. ते म्हणाले की,”काही लोकांनी स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी नक्षलवाद्यांच्या नावाने ही पत्रके आणि बॅनर्स लावले आहेत. त्यामागे त्यांचा काहीतरी भलताच हेतू दिसतोय. अशा समाजकंटकांचा शोध घेऊन त्यांच्यावर पोलीस प्रशासन कडक कायदेशीर कारवाई करेल,” असा इशारा फडणवीसांना दिला.




