Thursday, September 10, 2026
Homeक्राईमNashik Crime News : मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाची भीती दाखवून ५९ लाखांची फसवणूक

Nashik Crime News : मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाची भीती दाखवून ५९ लाखांची फसवणूक

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

तुमचे नाव मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात आले असून, तुम्हाला अटक होऊ शकते, अशी भीती दाखवत सायबर भामट्यांनी एका नागरिकाची तब्बल ५९ लाख ५८ हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

- Advertisement -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना ११ जुलै २०२६ रोजी दुपारी १२ वाजल्यापासून ते २२ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजेपर्यंत अज्ञात व्यक्तींनी व्हॉट्सअॅपवरून सातत्याने व्हॉइस कॉल, व्हिडिओ कॉल आणि चॅटद्वारे संपर्क साधला. संबंधितांनी स्वतःला मुंबई पोलीस अधिकारी असल्याचे भासवून फिर्यादींचे नाव मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात आल्याचा दावा केला.

दरम्यान, अटकेची भीती दाखवून फिर्यादींकडून टप्प्याटप्प्याने ५९ लाख ५८ हजार रुपये वेगवेगळ्या बँक खात्यांवर वर्ग करून घेण्यात आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादींनी पोलिसांत तक्रार दिली.

ताज्या बातम्या

Simhastha Kumbhmela 2027 – रस्ते विकासकामांना वेग; रस्त्यांच्या कामांची गुणवत्ता नियंत्रण...

0
नाशिक : प्रतिनिधी Nashik सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर शहरात सुरू असलेल्या रस्ते विकासकामांना वेग आला असून, कामांची गुणवत्ता तपासण्यासाठी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाच्या (NTKMA) गुणवत्ता नियंत्रण पथकाने तीन...