Wednesday, January 7, 2026
Homeब्रेकिंग न्यूजLadki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना आता पती आणि वडिलांचे e-KYC बंधनकारक;...

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना आता पती आणि वडिलांचे e-KYC बंधनकारक; सरकारचा आणखी एक नियम

मुंबई | Mumbai

महायुती सरकाने (Mahayuti Government) विधानसभा निवडणुकीआधी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण (Ladki Bahin Yojana) योजना जाहीर केली होती. या योजनेचा निवडणुकीत त्यांना मोठा फायदाही झाला. सध्या लाडकी बहीण योजनेचा राज्यातील २ कोटींपेक्षा अधिक महिला लाभ घेत असून, पात्र ठरलेल्या महिलांचा खात्यात दरमहा १५०० रुपये जमा होत आहेत. लाडकी बहीण योजनेमुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर प्रचंड मोठा आर्थिक भार पडत आहे. त्यामुळे
आता या योजनेतील बोगस लाभार्थी शोधण्यासाठी सरकारकडून पडताळणी करण्यात येत आहे.

- Advertisement -

राज्य सरकारने (Mahayuti Government) प्रत्येक निकषाची कठोर अंमलबजावणी करुन लाखो बोगस लाभार्थ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. यानंतर आता लाडकी बहीण योजनेसाठी सरकारने आणखी एक महत्त्वाचा नियम लागू केला आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेतील महिला लाभार्थ्यांची संख्या आणखी घटण्याची शक्यता आहे. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना आता ई केवायसी (e-KYC) अनिवार्य असून, पतीचे किंवा वडिलांचे आधारकार्ड देणे बंधनकारक करण्यात आले आहे. याबाबतची प्रक्रिया सरकारने चालू केली असून ही ई केवायसी ऑनलाईन पद्धतीने करायची आहे.

YouTube video player

दरम्यान, लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलेचे लग्नं झाले असेल तर पतीचे (Husbend) आणि लग्न झालं नसेल तर वडिलांचे (Father) उत्पन्न शोधले जाणार आहे. लाभार्थी महिलेच्या उत्पन्नासह वडील किंवा पतीचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त असल्यास संबंधित महिलेला लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरवले जाणार आहे. लाडकी बहीण योजनेसाठी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावे, अशी मुख्य अट आहे. पण अनेक पात्र झालेल्या महिलांचे उत्पन्न कमी आहे. यांनतर आता महिलेचे लग्न झाले असेल तर पतीचे आणि लग्न झालं नसेल तर वडिलांचे उत्पन्न याचीही चौकशी केली जाणार आहे.

अशी करता येईल ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण

  • मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या ई केवायसीसाठी https://ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
  • मुखपृष्ठावर असलेल्या ई केवायसी बॅनरवर क्लिक केल्यावर ई केवायसी फॉर्म उघडेल.
  • या फॉर्ममध्ये लाभार्थी महिलेला आपला आधार क्रमांक आणि पडताळणी संकेतांक (Captcha Code) नमूद करून, आधार प्रमाणीकरणासाठी संमती देत Send OTP या बटणावर क्लिक करावे.
  • त्यानंतर लाभार्थ्याच्या आधार-लिंक मोबाईल क्रमांकावर OTP येईल. हा OTP टाकून सबमिट बटणावर क्लिक करावे.

ई-केवायसीसाठी आवश्यक कागदपत्रे

आधार कार्ड, पासपोर्ट साईज फोटो, रहिवासी दाखला, रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र, उत्पन्नाचा दाखला, बँक खात्याची सविस्तर माहिती, नमूद केलेली इतर कागदपत्रे

ताज्या बातम्या

AMC Election : पैसे वाटपाचा संशय, विनानंबर दुचाकीतून लाखाची रोकड पकडली

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना पैसे वाटप केले जात असल्याच्या संशयावरून एका पक्षाच्या उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी दोन दुचाकी अडवून त्या तोफखाना पोलिसांच्या ताब्यात दिल्या....