Tuesday, June 16, 2026
Homeब्रेकिंग न्यूजChhagan Bhujbal : मंत्री भुजबळांचे हेलिकॉप्टर हेलिपॅडवर लँड करताना पायलटची गंभीर चूक;...

Chhagan Bhujbal : मंत्री भुजबळांचे हेलिकॉप्टर हेलिपॅडवर लँड करताना पायलटची गंभीर चूक; मोठा अनर्थ…

पुणे | Pune

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) पुण्यातील (Pune) एका कार्यक्रमाला हजेरी लावण्यासाठी मुंबईहून (Mumbai) निघाले होते. यावेळी हेलिकॉप्टर लँडिंगवेळी हेलिपॅड समजून पायलटने चक्क कार पार्किंग लॉटमध्ये लँडिंग केले. पायलटकडून घडलेल्या या मोठ्या चुकीमुळे एक मोठा अपघात टळला. सुदैवाने या घटनेत छगन भुजबळ यांच्यासह इतर कोणालाही इजा झालेली नसून, सर्वजण सुखरुप आहेत.

- Advertisement -

हे देखील वाचा : Tushar Bhosale : “मौलाना शरद पवार जाळीदार टोप्या घालून इफ्तार…”; ‘त्या’ विधानावरून भाजपच्या तुषार भोसलेंची जोरदार टीका

याबाबत अधिक माहिती अशी की, पुरंदर तालुक्यातील खानवडी (Khanwadi) येथे महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित भव्य कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी भुजबळ हे मुंबईहून पुण्याला येत होते. यावेळी गावात हेलिकॉप्टर लँडिंगसाठी हेलिपॅड तयार करण्यात आले होते. परंतु कार पार्किंग लॉटमध्ये मोकळी जागा पाहून तिथेच हेलिपॅड असल्याचा पायलटचा गैरसमज झाला आणि त्याने तिथे लँडिंग केल्याचे समजते.

दरम्यान, पार्किंगमध्ये (Parking) काही वाहने उभी असली तरी कोणालाही गंभीर दुखापत झाल्याची नोंद नाही. पोलिसांनी तातडीने पायलटला योग्य माहिती दिल्यानंतर हेलिकॉप्टर तिथून हलवण्यात आले. या घटनेत कुठलाही अनुचित प्रकार घडला नसून, सर्वजण थोडक्यात बचावले आहेत. प्रशासनाकडून या प्रकरणाची चौकशी होण्याची शक्यता असून, मंत्री छगन भुजबळ यांनी या घटनेबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

हे देखील वाचा : Ashok Kharat Crime News : खरातची उलाढाल सापडलीच ! ईडीकडून अशोकसह कल्पनाची चार बँक खाती गोठवली

पायलटवर कारवाई केली जाणार?

मंत्री छगन भुजबळ यांच्या कार्यालयाकडून सदर प्रकाराची गांभीर्याने दखल घेण्यात आली आहे. त्यामुळे आता पायलटवर कुठली कारवाई होणार का? किंवा प्रशासन काही निर्णय घेणार का? हे बघणे महत्वाचे असणार आहे. काही महिन्यांपूर्वीच राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामती येथे विमान कोसळून मृत्यू झाला होता. त्यानंतर आज मंत्री भुजबळ यांच्या हेलिकॉप्टरचा अपघात होता होता राहिला.

ताज्या बातम्या

Crime News : लाचखोरीची बारा वर्षे; २०५ अधिकारी-कर्मचाऱ्यांना शासकीय ‘अभय’

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik राज्यात भ्रष्टाचाराविरुद्ध 'झिरो टॉलरन्स'च्या गप्पा मारल्या जात असताना, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (Anti-Corruption Bureau) जाळ्यात अडकलेल्या लाचखोरांना मात्र शासनाचेच मूक अभय...