नाशिक | प्रतिनिधी | Nashik
कथित भोंदू अशोक खरात (Ashok Kharat) याच्या आर्थिक साम्राज्याला अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) पहिला दणका दिला आहे. खरातची नाशिकमधील (Nashik) तीन आणि त्याची पत्नी कल्पना खरात (Kalpana Kharat) हिचे एक अशा चार बँक खात्यांमधील सर्व व्यवहार ईडीने थांबवू सील केले आहेत. विशेष तपास पथकाने (एसआयटी) गुरुवारी ईशानेश्वर मंदिर आणि फार्महाऊसशी संबंधित सर्व कागदपत्रे ईडीच्या स्वाधीन केली असून, आता खरातच्या बेनामी मालमत्ता जप्त होण्याच्या हालचालींना वेग आला आहे.
गेल्या तीन वर्षांतील बँक व्यवहारांची (Bank Account) पडताळणी केली असता खरातच्या खात्यात नाशिकबाहेरून मोठ्या प्रमाणावर पैसे आल्याचे निष्पन्न झाले आहे. यात प्रामुख्याने मुंबई, पुणे आणि अहिल्यानगर येथील काही संशयास्पद खात्यांचा समावेश आहे. या खात्यांमधून खरातच्या खात्यात कोट्यवधी रुपयांची देवाणघेवाण झाली आहे. केवळ खरातच नव्हे तर त्याच्या मुलाच्या बँक व्यवहारांचीही सध्या एसआयटी आणि ईडीकडून (ED) संयुक्त चौकशी सुरू आहे. या प्रकरणात मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल झाल्यानंतर ईडीने आपला मोर्चा खरातला साथ देणाऱ्या पडद्यामागच्या सूत्रांकडे वळवला आहे. खरातने दोन खात्यांवर पत्नीला नॉमिनी केले होते, मात्र या पैशांचा वापर कुठे झाला, याचा तपास सुरू आहे.
हे देखील वाचा : Nashik Crime News : कॉर्पोरेटच्या आड ‘जिहाद’; कंपनीत तरुणींचे शोषण आणि धर्मांतराचा कट
अहवाल ईडीकडे सोपवला
ईडीच्या पथकाने उपनिबंधक (खरेदी-विक्री) कार्यालयाकडून स्थावर मालमत्तांची माहिती संकलित केली आहे. एसआयटीने तपासाचा अहवाल ईडीकडे सोपवला असून, त्याआधारे लवकरच मालमत्ता जप्तीची नोटीस बजावली जाण्याची शक्यता आहे.
हे देखील वाचा : Ashok Kharat Case : भोंदू खरात महिलांना जाळ्यात कसा ओढायचा? SIT प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी पत्रकार परिषदेत दिली धक्कादायक माहिती




