Friday, January 23, 2026
Homeब्रेकिंग न्यूजLadki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट; 'हे' काम केलं नाही...

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट; ‘हे’ काम केलं नाही तर होणार कारवाई

मुंबई | Mumbai
गेल्या वर्षी ऑगस्ट २०२४ मध्ये मोठ्या दणक्यात लाडकी बहीण योजना सुरु करण्यात आली. या लाटेत महायुतीचे सरकार भरघोस मतांनी निवडून आले. पण त्यानंतर या योजनेत सातत्याने नवनवीन निकष लागू करण्यात येत आहेत. या नवीन निकषांनी सरसकट अंमलबजावणीचे आदेश कधीच मागे टाकले आहेत. लाडकी बहीण योजनेतील बोगसगिरीला चाप लावण्यासाठी सरकार अलर्ट मोडवर आले आहे. आता सरकारने ईकेवायसी अनिवार्य केली आहे. त्यामुळे काही लाडक्या बहिणींना सुद्धा फटका बसण्याची शक्यता आहे.

लाडकी बहीण योजनेसंदर्भात आता नविन अपडेट आली असून राज्य सरकारकडून या योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना e-KYC (इलेक्ट्रॉनिक नो युवर कस्टमर) करणे बंधनकारक करण्यात आले आहे. ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास भविष्यात मिळणारे लाभ थांबवले जाण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

अदिती तटकरेंनी दिली माहिती
राज्याच्या महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. या योजनेत पारदर्शकता राखण्यासाठी आणि पात्र महिलांना वेळेवर लाभ मिळावा यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. तुमच्या माहितीत काही बदल झाल्यास किंवा तुम्ही योजनेच्या अटी पूर्ण करत नसल्यास ते पडताळणीतून स्पष्ट होते. थोडक्यात, ई-केवायसी ही प्रक्रिया योजनेतील योग्य लाभार्थ्यांनाच पैसे मिळतील याची खात्री करते.

YouTube video player

या प्रकारे तुम्हाला इ-केवायसी करता येणार

महिलांना सीएससी सेंटरवरून अथवा स्वतः ऑनलाईन पद्धतीने ई-केवायसी करता येईल. त्यासाठी अत्यावश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील.

या योजनेच्या ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन ईकेवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल

या प्रक्रियेत लाभार्थी महिलेचे नाव, पत्ता, आधार कार्ड, रेशन कार्ड, उत्पन्नाची माहिती भरावी लागेल.

ही प्रक्रिया लवकरच सुरू होईल. त्यासाठी संकेतस्थळावर लवकरच पॉपअप विंडो सुरू होण्याची शक्यता आहे.

ही प्रक्रिया सोपी आहे. जसे ही प्रक्रिया सुरू होईल. तशी ईकेवायसी पूर्ण करा. नाहीतर नंतर गर्दी उसळेल आणि साईटवरी ताण येईल

पुढील मनस्ताप टाळण्यासाठी आणि योजनेचा हप्ता सुरू राहण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया लवकर पूर्ण करा

ई-केवायसी न करणाऱ्यांवर होणार कारवाई
शासनाच्या परिपत्रकानुसार, ज्या महिला दोन महिन्यांच्या आत ई-केवायसी करणार नाहीत, त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे कोणताही अडथळा न येता योजनेचा लाभ सुरू राहावा यासाठी ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करणे आवश्यक आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

पडसाद : .. अन् मनसे एका जागेवरच थांबली!

0
नाशिक महापालिकेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आलेख गेल्या चौदा वर्षांत चाळीस जागांवरून अवघ्या एका जागेवर आला, ही पडझड केवळ एका पक्षाच्या पतनाची नव्हे तर राज...