Wednesday, February 4, 2026
Homeब्रेकिंग न्यूजSharad Pawar : शेतकर्‍यांचा संसार अडचणीत तरी सरकार ढुंकूनही पाहत नाही -...

Sharad Pawar : शेतकर्‍यांचा संसार अडचणीत तरी सरकार ढुंकूनही पाहत नाही – शरद पवारांचा घणाघात

नाशिक | Nashik

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या (NCP Sharad Pawar Faction) वतीने आज (सोमवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर गोल्फ क्लब मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य आक्रोश मोर्चा काढला. शरद पवारांच्या भाषणाने मोर्चाची सांगत झाली. यावेळी शरद पवारांनी आपल्या भाषणात शेतकरी आत्महत्या, कर्जमाफीसह सरकारच्या चुकीच्या धोरणांवर कडाडून प्रहार केला. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील इशारा दिला.

- Advertisement -

यावेळी बोलतांना शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले की,”काळ्या आईशी इमान राखणारे शेतकरी अस्वस्थ आहे. कधी अतिवृष्टी तर कधी दुष्काळ असतो. अतिवृष्टी झाली तर त्याचा परिणाम शेतकरी वर्गावर होता. त्यामुळे शेतकऱ्यावर संकट आल्यावर त्याला मदत करण्याची जबाबदारी राज्य आणि केंद्राची असते. पण आजचे राज्यकर्ते जबाबदारी घ्यायला तयार नाहीत. गेल्या दोन महिन्यात दोन हजार पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. शेतकरी जीव देतो, एवढी टोकाची भूमिका घेतो परंतु असे असतानाही संकटाच्या काळात राज्यकर्ते त्याच्या मागे उभे राहत नाही ही फार गंभीर गोष्ट आहे”, असे त्यांनी म्हटले.

YouTube video player

पुढे ते म्हणाले की, “एकीकडे शेतकर्‍यांचा संसार अडचणीत आला असताना दुसरीकडे देवाभाऊंनी सगळ्या महाराष्ट्रात पोस्टर लावून छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेत असल्याचे दाखवले. बळीराजा उपाशी राहत कामा नये, ही शिवाजी महाराजांची शिकवण होती. तो आदर्श देवाभाऊ घेतील असे वाटले होते पण त्यांनी तसे केले नाही.जर शेतकऱ्यांच्या या मोर्चाची दखल घेतली नाही तर नाशिकचा हाच मोर्चा भविष्यात आणखी उग्र रूप घेईल. नेपाळमध्ये काय घडले त्याच्या खोलात मी जात नाही. मात्र देवाभाऊ यातून शहाणपणा घेतील, असा इशाराही शरद पवारांनी यावेळी दिला.

आम्ही ७० हजार कोटींची कर्जमाफी केली

मी देशाचा कृषीमंत्री असताना एकदा माझ्या वाचनात आले की, यवतमाळ जिल्ह्यात शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. दुसऱ्या दिवशी मनमोहन सिंग याना विनंती केली शेतकरी जीव देत आहे हे आपण समजून घेतले पाहिजे. त्यासाठी आपल्याला दिल्लीत बसून विषय सुटणार नाही. जिल्ह्याजिल्ह्यांत जाऊन समजून घेऊ अशी विनंती मी त्यांना केली. त्यानंतर तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग तयार झाले आणि नागपूर, अमरावती, यवतमाळला आम्ही गेलो. आत्महत्या केलेल्या कुटुंबाची भेट घेतली. शेतकऱ्यांच्या बायका ढसाढसा रडत होत्या. मी विचारले तुम्ही का रडताय? त्यावर सोसायटीचे कर्ज काढले होते, ते आता थकले आहे, खाजगी सावकारकडचे कर्ज थकले आहे. मालकाला सहन झाले नाही. त्यांनी जीवन संपवले, अशा तक्रारी माझ्याकडे आल्या. कर्जबाजारीपणा हा मोठा रोग असून, त्यावर उपचार केले पाहिजे म्हणून आम्ही १० दिवसांत ७० हजार कोटी रुपये देऊन कर्जमाफी केली, अशी आठवण शरद पवार यांनी आपल्या भाषणात सांगितली.

सरकारला शेतकऱ्यांचे दुख समजत नाही

नाशिकचा कांदा जगात जातो. पैसे आल्यावर मुलीचे लग्न, मुलांचे शिक्षण करतो. त्यात सरकारने निर्यातीला बंदी केली. याठिकाणी किंमत देत नाही आणि बाहेर विकू देत नाही. तीच गोष्ट सोयाबीन आणि इतर शेतीची आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत आला असून, सरकारला शेतकऱ्यांचे दुख समजत नाही, असेही शरद पवारांनी म्हटले.

ताज्या बातम्या

Rahata : लोणीचे हवालदार साळवी निलंबित; काय आहे कारण?

0
राहाता |प्रतिनिधी| Rahata राहाता तालुक्यातील ममदापूर येथे सुरू असलेल्या अवैध कत्तलखान्यांवर कारवाई करण्यास टाळाटाळ करणे आणि आरोपींशी आर्थिक हितसंबंध जोपासल्याचा ठपका ठेवत, लोणी पोलीस...