Thursday, May 15, 2025
Homeब्रेकिंग न्यूजMaharashtra News : सीसीटीव्ही लावा, सेवकांची मद्य चाचणी करा; राज्य सरकारची शाळांसाठी...

Maharashtra News : सीसीटीव्ही लावा, सेवकांची मद्य चाचणी करा; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली

मुंबई | Mumbai 

- Advertisement -

महाराष्ट्र सरकारने (Maharashtra Government) लहान मुलांचे लैंगिक शोषण थांबवण्यासाठी राज्यातील शाळांसाठी नवी नियमावली जाहीर केली. त्यानुसार राज्यातील प्रत्येक शाळांत सीसीटीव्ही कॅमेरा बसवणे अनिवार्य असेल. याशिवाय मुलांसाठी सत्रांचे आयोजन करणे, शालेय कर्मचाऱ्यांची तपासणी करणे बंधनकारक करण्यात आले. नियमांचे पालन न केल्यास सरकारी अनुदान रोखणे किंवा शाळेची मान्यता रद्द करणे यासारखी कारवाई केली जाऊ शकते.

ठाणे जिल्ह्यातील (Thane District) बदलापूरमधील एका नामांकीत शाळेतील दोन चिमुकलींवर अत्याचार करण्यात झाला. या पार्श्वभूमीवर शाळांमधील सुरक्षा वाढवण्यासाठी हे नवीन नियम बनवण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने १३ मे २०२५ रोजी एक जीआर जारी केला. १८ त्यानुसार वर्षांखालील प्रत्येक व्यक्तीला अल्पवयीन मानले जाईल. शाळेत कोणताही गुन्हा (Case) घडल्यास त्याची माहिती स्थानिक पोलिसांना किंवा बालकल्याण पोलीस विभागाला (Police Department) देणे बंधनकारक आहे.

अशी आहे नियमावली

– सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे अनिवार्य आहे. कॅमेऱ्यांचे फुटेज किमान एक महिना जपून ठेवणे बंधनकारक.
– शक्य असल्यास पूर्वप्राथमिक ते इयत्ता सहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी महिला शिक्षकांची नियुक्ती करा.
– शालेय कर्मचाऱ्यांची कसून तपासणी करा, आवश्यक असल्यास चारित्र्य प्रमाणपत्र घ्या.
– बसचालकासह इतर कर्मचाऱ्यांची नियमितपणे अल्कोहोल चाचणी करणे अनिवार्य.
– प्रत्येक स्कूल बसमध्ये एक महिला कर्मचारी असणे अनिवार्य.
– शाळेच्या आवारात १०९८ हा चाईल्ड हेल्पलाईन क्रमांक दर्शनी भागात लावावा.
– मुले शाळेत गैरहजर असतील तर मेसेजद्वारे त्यांच्या पालकांना सूचना द्यावी.
– मानसिक दबावाखाली असलेल्या किंवा त्रासलेल्या विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन सत्रांचे आयोजन करावे.
– लहान मुलांना ‘गुड टच’ आणि ‘बॅड टच’ बद्दल माहिती द्यावी.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

गृह

मोठी बातमी! गृह खात्याचा मोठा निर्णय, आता पोलीस कॉन्स्टेबललाही गुन्ह्यांचा तपास...

0
मुंबई | Mumbai राज्यात महायुतीचे सरकार आल्यापासून आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांच्या अनेकदा बदल्या होताना पाहायला मिळत आहेत. तर सातत्याने राज्यातील गुन्हेगारीमध्येही मोठ्या प्रमाणात वाढ होताना...