Wednesday, January 7, 2026
Homeब्रेकिंग न्यूजMaharashtra News : पेट्रोलियम पदार्थांच्या भेसळीचा अर्थव्यवस्थेवर थेट परिणाम - उच्च न्यायालयाने...

Maharashtra News : पेट्रोलियम पदार्थांच्या भेसळीचा अर्थव्यवस्थेवर थेट परिणाम – उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता

दोघांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

मुंबई | प्रतिनिधी | Mumbai

पेट्रोलियम पदार्थांतील भेसळीचा सार्वजनिक सुरक्षितता, देशाची अर्थव्यवस्था तसेच राज्याच्या महसूलावर थेट परिणाम होतो, असे निरिक्षण उच्च न्यायालयाने (High Court) नोंदवले आणि भेसळशी संबंधित गुन्ह्यात दोघांचा अटकपूर्व जामीन (Anticipatory Bail) अर्ज फेटाळून लावला. हे गुन्हे सार्वजनिक जीवनातील महत्त्वाच्या क्षेत्रावर परिणाम करतात. त्यामुळे अटकपूर्व जामीन अर्जांचा अत्यंत गांभीर्याने विचार केला पाहिजे, असेही न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या एकलपीठाने स्पष्ट केले.

- Advertisement -

कस्टम-बॉन्डेड वेअरहाऊसमधून आठ टँकर जप्त केले होते. तेथे भेसळयुक्त डिझेल आढळले. त्याप्रकरणी आरोपी हेतन राम गंगवानी आणि यश राम गंगवानी यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता, २०२३ च्या कलम २८७, १२५, ३(५) आणि विशेष कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांनी अटक टाळण्यासाठी उच्च न्यायालयात अटकपूर्व जमिनासाठी याचिका दाखल केली होती. त्यांच्या या याचिकेवर न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या एकलपीठासमोर सुनावणी झाली.

YouTube video player

यावेळी सरकारी वकिलांनी अटकपूर्व जामीन अर्जांवर तीव्र आक्षेप घेतला. पेट्रोलियम उत्पादनांचा व्यापार तीन कंपन्यांमध्ये होत असल्याचे दाखवलेले असले तरी सर्व आरोपी यश गंगवानी यांच्या एकाच ईमेल आयडीशी जोडलेले होते. यावरुन सर्व व्यवहार एकाच व्यक्तीने केले होते हे उघड होत असल्याचा दावा केला. त्याची दखल न्यायमूर्ती बोरकर यांनी घेतली.

पेट्रोलियम पदार्थांची बेकायदेशीर हाताळणी आणि भेसळशी (Adulterated) संबंधित गुन्ह्याचा सार्वजनिक सुरक्षितता, देशाची अर्थव्यवस्था तसेच राज्याच्या महसूलावर थेट परिणाम होतो. अशा प्रकारच्या गुन्ह्यांना खाजगी वाद म्हणून पाहिले जाऊ शकत नाही, असे एकलपीठाने निकालपत्रात स्पष्ट करीत दोन्ही आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यास स्पष्ट नकार दिला.

ताज्या बातम्या

Nashik Accident News : चाचडगाव टोलनाक्याजवळ ईरटीका-स्कॉर्पिओचा भीषण अपघात; चौघे जागीच...

0
दिंडोरी | Dindori तालुक्यातील नाशिक-पेठ रस्त्यावरील (Nashik-Peth Road) चाचडगाव टोलनाक्याजवळ (Chachadgaon Toll Plaza) ईरटीका आणि स्कॉर्पिओचा भीषण अपघात (Ertika-Scorpio Accident) झाल्याची घटना घडली आहे. या...