Thursday, May 7, 2026
Homeब्रेकिंग न्यूजVishwas Patil : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी 'पानिपत'कार विश्वास पाटील...

Vishwas Patil : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील यांची निवड

पुणे | Pune

सातारा (Satara) येथे होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या (Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan) अध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील (Vishwas Patil) यांची निवड करण्यात आली आहे. पुण्यामध्ये (Pune) आज अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये अध्यक्षपदाबाबतचा निर्णय घेण्यात आला.

- Advertisement -

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी विश्वास पाटील यांच्यासह भालचंद्र नेमाडे (Bhalchandra Nemade) आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठीच्या समितीचे अध्यक्ष रंगनाथ पठारे यांच्या नावाची चर्चा होती. यातील नेमाडे यांनी नकार दिला होता. त्यामुळे पाटील आणि पठारे यांची नावे बाकी होते. अखेर विश्वास पाटील यांच्या नावावर आजच्या बैठकीत (Meeting) शिक्कामोर्तब करण्यात आले.

दरम्यान, विश्वास पाटील हे मराठी साहित्यातील एक प्रसिद्ध व लोकप्रिय कादंबरीकार आहेत. त्यांनी ऐतिहासिक, सामाजिक व राजकीय विषयांवर आधारित अनेक प्रभावी कादंबऱ्या लिहिल्या आहेत. ‘पानिपत’ ही (Panipat) त्यांची सर्वाधिक गाजलेली ऐतिहासिक कादंबरी असून, त्यातून त्यांनी आपल्या संपादकीय शैलीची एक छाप मराठी वाचकांवर पाडली आहे.

ताज्या बातम्या

भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
मुंबई | वृत्तसंस्था Mumbai भारत आणि व्हिएतनाम यांच्यातील संबंध अधिक बळकट करण्यासाठी महाराष्ट्र विश्वासार्ह भागीदार म्हणून कार्य करण्यास सज्ज आहे. व्हिएतनाम सोबत सांस्कृतिक, आर्थिक आणि...