Tuesday, December 3, 2024
Homeब्रेकिंग न्यूजMaharashtra News : विवेक फणसाळकर यांच्याकडे राज्याच्या पोलीस महासंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार

Maharashtra News : विवेक फणसाळकर यांच्याकडे राज्याच्या पोलीस महासंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार

मुंबई | Mumbai

ऐन विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) धामधुमीत निवडणूक आयोगाने राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांच्या बदलीचे निर्देश दिले. विरोधीपक्षाच्या आरोपानंतर निवडणूक आयोगाने रश्मी शुक्ला यांची तात्काळ बदली केली आहे. त्यानंतर आता विवेक फणसाळकर यांच्याकडे राज्याच्या पोलीस महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : मोठी बातमी! अखेर पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली; महाविकास आघाडीच्या मागणीला यश

निवडणूक आयोगाने वरिष्ठ आयपीएस केडरमधील सेवाज्येष्ठतेनुसार अधिकाऱ्याची तात्काळ महासंचालक म्हणून नियुक्ती करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार विवेक फणसाळकर (Vivek Phansalkar) यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे.मूळचे पुण्याचे असलेल्या विवेक फणसाळकर सध्या मुंबई पोलिस आयुक्त (Mumbai Police Commissioner) म्हणून देखील काम पाहत आहेत. त्यानंतर आता त्यांच्याकडे राज्याच्या पोलीस महासंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे.

हे देखील वाचा : Chhagan Bhujbal : जरांगेंनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “देर आए दुरुस्त…”

दरम्यान, आज दुपारी एक वाजेपर्यंत तीन आयपीएस अधिकाऱ्याची ( IPS officer) समिती नियुक्त करण्याचे राज्याच्या मुख्य सचिवांना निर्देश देण्यात आले होते. ही तीन जणांची समिती राज्याचे नवे पोलीस महासंचालक निवडणार आहे. तर राज्याच्या पोलीस महासंचालकपदासाठी विवेक फणसाळकर, संजय कुमार वर्मा, संजीव कुमार सिंघल या तीन नावांची चर्चा असून यात मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांचे नाव आघाडीवर आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या