Tuesday, October 13, 2026
HomeनाशिकNashik News : सुट्टीमुळे सप्तशृंगी गड घाटात वाहतूक कोंडी; भाविक संतप्त

Nashik News : सुट्टीमुळे सप्तशृंगी गड घाटात वाहतूक कोंडी; भाविक संतप्त

सप्तशृंगीगड | वार्ताहर |

स्वातंत्र्यदिनाच्या लांब सुट्टीमुळे श्रीक्षेत्र सप्तशृंगी गडावर (Saptashrungi Gad Ghat) दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. यामुळे गडाकडे जाणाऱ्या घाट रस्त्यावर आज (शनिवार) भीषण वाहतूक कोंडी झाली होती.

- Advertisement -

सकाळपासूनच घाटात दोन्ही बाजूंनी गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पांढऱ्या कार, ईको व्हॅन आणि इतर लहान-मोठी वाहने रस्त्यावर (Roads) तासनतास अडकून पडली होती. समोर सप्तशृंगीचा हिरवा डोंगर दिसत असतानाही भाविकांना पुढे जाता येत नव्हते.

बांधकामामुळे गोंधळ

सूत्रांच्या माहितीनुसार, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून (Public Works Department) घाटात सुरू असलेल्या रस्ता दुरुस्तीच्या कामामुळे रस्ता अरुंद झाला आहे. पावसाळा एकाच रस्त्यावरून दोन्ही बाजूची वाहतूक जास्त गर्दी यामुळे हा गोंधळ वाढला आहे.

भाविकांचा संताप

दर्शनाला दोन तासात पोहोचू म्हणून निघालो होतो, पण तीन तास झाले तरी घाटातच आहोत. लहान मुले आणि वृद्धांना खूप त्रास होत आहे,अशी प्रतिक्रिया अडकलेल्या भाविकांनी दिली.

प्रशासनाला मागणी

सणासुदीच्या काळात तरी रस्त्याचे काम बंद ठेवावे किंवा पर्यायी वाहतूक व्यवस्था करावी अशी मागणी भाविक आणि स्थानिकांकडून केली जात आहे.

संदीप बेनके

ताज्या बातम्या

Ahilyanagar : 96 ग्रामपंचायतीमधील 2 हजार 800 महिलांचा सहभाग

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar ग्रामीण भागातील महिलांचे संघटन बळकट करून त्यांना महिला बचत गटांच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे आणि ग्रामीण विकासाच्या प्रक्रियेत त्यांचा सक्रिय सहभाग वाढविण्याच्या...