नवी दिल्ली | New Delhi
शिवसेना, राष्ट्रवादीच्या पक्ष आणि निवडणूक चिन्ह वादावर सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेली सुनावणी आज (बुधवारी) पार पडली. गेल्या काही वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयात ही सुनावणी सुरु असून, आजची सुप्रीम कोर्टातील सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे आता शिवसेना, राष्ट्रवादीच्या पक्ष आणि निवडणूक चिन्ह वादावर शुक्रवारी सुनावणी होणार आहे.
हे देखील वाचा : Political News : सर्वोच्च न्यायालयात आज ३० जिल्हा परिषदांच्या निवडणुकांबाबत महत्त्वपूर्ण सुनावणी; काय निर्णय होणार?
शुक्रवार (दि.२३) रोजी शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती आहे. त्याचदिवशी शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह वादावर सकाळी ११ वाजता सरन्यायाधीशांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडणार आहे. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष आणि निवडणूक चिन्हावर सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार असल्याने याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.
शिवसेनेत जून २०२२ मध्ये झाला होता राजकीय भूकंप
शिवसेनेत २०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसह बंड पुकारत भाजपसोबत युती केल्याने राजकीय भूकंप झाला होता. यामुळे राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील असणारे महाविकास आघाडीचे सरकार कोसळले होते. एकनाथ शिंदेंनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबतची युती शिवसेनेच्या मूळ विचारधारेपासून दूर जाणारी होती. त्यामुळे आमदारांसह बंडखोरी केल्याचे त्यावेळी सांगितले होते. मात्र, या बंडखोरीमुळे पक्ष, चिन्ह आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.




