Thursday, July 30, 2026
Homeब्रेकिंग न्यूजठाकरे सेनेत पुन्हा फुट! खासदार वेगळा गट स्थापन करण्यासाठी लोकसभा अध्यक्षांना पत्र...

ठाकरे सेनेत पुन्हा फुट! खासदार वेगळा गट स्थापन करण्यासाठी लोकसभा अध्यक्षांना पत्र देणार? संजय राऊत तातडीने दिल्लीला जाणार

मुंबई | Mumbai

ठाकरे सेनेचे काही खासदार (Shivsena UBT MP) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेच्या संपर्कात असल्याचा दावा करत गेल्या काही दिवसांपासून राज्यात ‘ऑपरेशन टायगर’ च्या चर्चा सुरु झाल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी काल (रविवारी) ‘मातोश्री’ निवासस्थानी सर्व खासदारांची महत्त्वपूर्ण बैठक बोलावली होती. या बैठकीला काही खासदार प्रत्यक्ष तर काही ऑनलाईन हजर होते.

- Advertisement -

हे देखील वाचा : धक्कादायक! ‘कुमकुम भाग्य’ फेम प्रसिद्ध अभिनेत्री संचिता उगले हिने संपवलं आयुष्य; टोकाचं पाऊल उचलण्यामागे कारण काय?

मात्र, त्यानंतरही आता ठाकरे सेनेचे काही खासदार वेगळा गट स्थापन करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. यातील काही खासदारांनी शिंदे यांच्या पक्षाचे खासदार तथा केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav) यांची भेट घेतली आहे. त्यानंतर आता हे खासदार लोकसभा अध्यक्षांची भेट घेऊन त्यांना वेगळा गट स्थापन करण्याबाबत पत्र देणार असल्याचे समजते. या घडामोडींमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून, खासदार संजय राऊत तातडीने दिल्लीला रवाना होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

हे देखील वाचा : Shivsena UBT MP Meeting : ‘मातोश्री’वरील बैठकीला कोणत्या खासदाराची उपस्थिती अन् कोणाची दांडी? संजय राऊतांनी सगळंच सांगितलं

दरम्यान, काल ठाकरे गटातील (Shivsena UBT Group) खासदारांच्या बैठकीनंतर संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलतांना “सर्व खासदार आमच्यासोबत असून, ते पक्ष सोडून कुठेही जाणार नाहीत असे म्हटले होते. तसेच ‘ऑपरेशन टायगर’ वगैरे काहीही नाही म्हणत आता आम्हीच ‘ऑपरेशन लांडगा’ सुरू करू, असेही राऊत म्हणाले होते. मात्र, आता ठाकरे यांचे काही खासदार थेट नवा गट स्थापन करण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जाते.

ताज्या बातम्या

पडसाद : बँक संचालकांची कालमर्यादा, वास्तव काय?

0
नाशिक | शैलेंद्र तनपुरे - दै. 'देशदूत' - संपादक केंद्र सरकारमध्ये सहकार या विषयासाठी स्वतंत्र खात्याची निर्मिती झाल्यानंतर बरेच बदल झाले आहेत. मुख्य म्हणजे बँकिंग...