मुंबई | Mumbai
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह एकूण पाच जणांचा आज (बुधवारी) सकाळी बारामतीमध्ये विमान लॅंडिंगदरम्यान अपघातात मृत्यू झाला. त्यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला असून, राज्यात तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.
हे देखील वाचा : मोठी बातमी! उपमुख्यमंत्री अजित पवारांचा विमान अपघातात मृत्यू
अजित पवारांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, नितीन गडकरी, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी, राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मलिकार्जून खर्गे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह दिग्गज नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. यानंतर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पोस्ट करत अजित पवारांना श्रद्धांजली वाहिली आहे.
हे देखील वाचा : Ajit Pawar Death : दमदार आणि दिलदार मित्र सोडून गेला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
उद्धव ठाकरे यांनी पोस्टमध्ये म्हटले की, अत्यंत शिस्तप्रिय, आपल्या खात्यावर वचक व अर्थ विभागाचा अभ्यास असणारे ते नेते होते. एक उत्तम सहकारी म्हणून त्यांचे माझे विशेष नाते जमले. अजित पवार हे दिलखुलास होते. मनात येईल ते बोलायचे. ते दीर्घद्वेषी नव्हते. राजकारणात (Political) त्यांनी वेगळा मार्ग स्वीकारला, तरी त्यांनी संबंध तुटू दिले नाहीत. महाराष्ट्रात ते ‘दादा’ म्हणून लोकप्रिय होते. ते असे अकाली जातील असे वाटले नव्हते. कार्यकर्त्यांना जपणारा नेता म्हणून ते परिचित होते. त्यांच्या जाण्याने राज्यातील नेतृत्वात पोकळी निर्माण झाली. ते सर्वार्थाने ‘दादा’ होते. दादांना माझ्यातर्फे, ‘ठाकरे’ व शिवसेना परिवारातर्फे श्रद्धांजली! असे त्यांनी म्हटले.
हे देखील वाचा : Ajit Pawar Death : महाराष्ट्राच्या राजकारणाने एक उमदा नेता गमावला – मनसे अध्यक्ष राज ठाकरे
सचिन तेंडुलकरनेही वाहिली श्रद्धांजली
भारताचा स्टार क्रिकेटपटू मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याने एक्स अकाउंटवर पोस्ट करत अजित पवारांनी श्रद्धांजली वाहिली आहे. ‘अजित पवार यांच्या निधनाची बातमी ऐकून खूप दुःख झाले. महाराष्ट्रासाठी काम करणारा एक चांगला नेता आज आपण अचानक गमावला आहे. पवार कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो. भावपूर्ण श्रद्धांजली. ॐ शांती’, असे त्याने म्हटले आहे.
हे देखील वाचा : Ajit Pawar Death : अजितदादांच्या विमानाचा अपघात कसा झाला? बारामतीत प्रत्यक्षदर्शीने सांगितली थरारक घटना




