Wednesday, February 4, 2026
Homeब्रेकिंग न्यूजAjit Pawar : मुख्यमंत्री फडणवीसांशी चर्चा करून कोकाटेंबाबत निर्णय घेणार - अजित...

Ajit Pawar : मुख्यमंत्री फडणवीसांशी चर्चा करून कोकाटेंबाबत निर्णय घेणार – अजित पवारांचे मोठे संकेत

आधी दोनदा दिली होती माणिकरावांना वार्निंग, आता मंत्रीपद जाणार?

मुंबई | Mumbai

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) आपल्या वादग्रस्त विधानामुळे नेहमीच चर्चेत असतात. नुकताच त्यांचा विधिमंडळ सभागृहात रमी खेळतानाचा व्हिडीओ समोर आला होता. त्यामुळे विरोधकांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही रमी व्हिडीओवरून कोकाटेंवर नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी कोकाटेंच्या ‘रमी’च्या व्हिडीओवर भाष्य केले आहे. त्यांनी मुंबईत माध्यमांशी संवाद साधला.

- Advertisement -

यावेळी बोलतांना पवार म्हणाले की, “मला जी माहिती मिळाली त्यानुसार कोकाटेंचा व्हिडीओ (Video) सभागृहाच्या आतील आहे. विधिमंडळाचा परिसर हा विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) आणि विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे (Ram Shinde) यांच्या अखत्यारित येतो. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी त्यांच्याकडूनही सुरू आहे”, अशी माहिती त्यांनी दिली. तसेच माझी अजून माणिकराव कोकाटेंशी भेट झालेली नाही. पुढील आठवड्यात सोमवारी किंवा बुधवारी भेट होईल. त्यावेळी समोरासमोर चर्चा करुन कोकाटे यांच्याबाबत निर्णय घेऊ, असेही अजित पवारांनी सांगितले.

YouTube video player

पुढे ते म्हणाले की, “प्रत्येकावर जबाबदारी आहे, त्यामुळे आपण बोलताना भान ठेवले पाहिजे ,अशी सक्त सूचना मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली आहे. मी सुद्धा माझ्या लोकांना (People) याची माहिती दिली होती. याआधीही कोकाटेंकडून असे दोनदा घडले होते तेव्हा मी दखल घेतली होती आणि त्यांना पुन्हा असे काही घडू नये याबाबत स्पष्ट शब्दांत सांगितले होते. दुसऱ्यांदा घडलं तेव्हा सुद्धा मी त्यांना जाणीव करुन दिली होती. इजा बिजा झाली आता तिजाची वेळ आणू नका असे मी कोकाटे यांना सांगितले होते”, असेही अजित पवार यांनी म्हटले.

महाराष्ट्रात आधी मराठी मग बाकी…

सगळ्यांनी आपापलं भान ठेवले पाहिजे. प्रत्येक राज्यात त्यांच्या मातृभाषा महत्त्वाची असते. भारतात त्या त्या राज्याची मातृभाषा वगळली तर दुसरी भाषा हिंदी चालते. तिसरी भाषा इंग्रजी चालते. प्रत्येकाला आपल्या मातृभाषेबाबत आदर असला पाहिजे. ती टिकली पाहिजे. परंतु याठिकाणी राहणाऱ्यांनी पण मराठी बोलता येत नसेल तर त्यांनी शिकण्याचा प्रयत्न करावा. मी बोलणारच नाही अशी भाषा वापरू नका. जिथे तुम्ही राहता तिथली भाषा, माणसांचा विचार करायला हवा. आम्ही मराठीचा आदर करू, मराठी शिकू असं बोलले तर समस्या येणार नाही. हा महाराष्ट्र आहे. येथे पहिले मराठी चालते. फुले, शाहू, आंबेडकरांच्या महाराष्ट्रात आधी मराठी मग बाकी अशी भूमिका देखील अजित पवारांनी मराठी-हिंदी वादावर मांडली.

लातूरमधील मारहाणीच्या घटनेवर काय म्हणाले?

ज्यावेळी मला लातूरमधील मारहाणीच्या घटनेबाबत कळले तेव्हा मी ताबडतोब ट्विट करून त्यावर माझी भूमिका स्पष्ट केली. संबंधित पदाधिकाऱ्याला राजीनामा देण्याचे आदेश दिले. यशवंतराव चव्हाणांनी जी शिकवण आपल्याला दिली त्याला गालबोट लागता कामा नये. त्या दृष्टीने मी राजीनामा देण्याची सूचना केली आणि त्याने राजीनामा दिला आहे असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

त्या’ प्रकरणाची चौकशी होईल

सांगली जिल्ह्यातील (Sangali District) वाळवा तालुक्यातील तांदुळवाडी (Tandulwadi) गावातील रहिवासी असलेल्या युवा कंत्राटदार हर्षल पाटील (Harshal Patil) यांनी दीड कोटींच्या थकित बिलासाठी आत्महत्या केली. यावरून विरोधकांकडून सरकारवर टीकेची झोड उठवली जात आहे. त्यावर आज माध्यमांशी बोलतांना अजित पवार म्हणाले की, आमची आज सकाळी एक बैठक झाली आहे. एका कंत्राटदाराने सब कंत्राटदाराला नेमले, त्याने त्याला पैसे दिले नाहीत. मी कंत्राटदाराची माहिती घेत आहे. तरीपण एखाद्या व्यक्तीचा जीव गेला आहे. त्यामुळे सगळ्या प्रकरणाची चौकशी केली जाईल. तसेच, कुणाची बिले दिली नाहीत, त्याची यादी मला द्या. बिले देण्याची काही प्रक्रिया आहे, असे त्यांनी म्हटले.

ताज्या बातम्या

Rahata : लोणीचे हवालदार साळवी निलंबित; काय आहे कारण?

0
राहाता |प्रतिनिधी| Rahata राहाता तालुक्यातील ममदापूर येथे सुरू असलेल्या अवैध कत्तलखान्यांवर कारवाई करण्यास टाळाटाळ करणे आणि आरोपींशी आर्थिक हितसंबंध जोपासल्याचा ठपका ठेवत, लोणी पोलीस...