Tuesday, March 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजMaharashtra Politics : धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर 'या' नेत्याला मंत्रिपदाची लॉटरी...

Maharashtra Politics : धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर ‘या’ नेत्याला मंत्रिपदाची लॉटरी लागणार?

मुंबई | Mumbai

बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Murder Case) यांच्या हत्येचे फोटो व्हायरल झाल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. त्यानंतर आज (दि.४) रोजी धनंजय मुंडे यांनी आपल्याकडे असणाऱ्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता धनंजय मुंडे यांच्या जागी राष्ट्रवादीतून मंत्रीपदी पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची वर्णी लागण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.

- Advertisement -

राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) नाराज झाले होते. त्यानंतर त्यांनी वेळोवेळी माध्यमांशी संवाद साधताना आपली नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली होती. नाशिकमध्ये झालेल्या समता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात “मी सामान्य कार्यकर्ता आहे. मला डावलंल काय, फेकलं काय, काय फरक पडतो? मंत्रिपदे किती आली किती गेली. पण छगन भुजबळ संपला नाही”, असे म्हटले होते. याशिवाय त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर देखील जोरदार हल्लाबोल केला होता. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडून छगन भुजबळ यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

दरम्यान, त्यानंतर आता धनंजय मुंडे यांनी राजीनामा (Resignation) दिल्यांनतर त्यांच्या जागी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना संधी मिळू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. तसेच राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके, अमळनेरचे आमदार अनिल पाटील आणि उदगीरचे आमदार संजय बनसोडे यांच्या देखील नावाची चर्चा सुरु आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादीतून (NCP) नेमकी कोणत्या नेत्याला संधी मिळते? हे बघणे महत्त्वाचे असणार आहे.

मुंडेंनी राजीनामा दिल्यांनतर भुजबळ काय म्हणाले?

धनंजय मुंडे यांनी आज सकाळी मंत्रिपदाचा (Ministerial) राजीनामा दिल्यांनतर छगन भुजबळ यांनी माध्यमांशी बोलतांना प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की,”धनंजय मुंडेनी राजीनामा दिलेला आहे. आता या संदर्भात पक्षाची भूमिका लवकरच जाहीर होईल. पक्षाची भूमिका पहिल्यापासूनच ही होती की कोणत्याही बेकायदेशीर कृत्याला पाठीशी घालणार नाही. आमची भूमिका न्यायाचीच होती. पण एक लक्षात घेतले पाहिजे की, धनंजय मुंडे यांनी नैतिकतेला धरून राजीनामा दिलेला आहे”, असे भुजबळ यांनी म्हटले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...