Monday, February 23, 2026
Homeब्रेकिंग न्यूजEknath Shinde : शब्द आणि वेळेला महत्व देणारा नेता अन् ११ वेळा...

Eknath Shinde : शब्द आणि वेळेला महत्व देणारा नेता अन् ११ वेळा अर्थसंकल्प मांडणारा विक्रमवीर गमावला – DCM शिंदे

मुंबई | Mumbai

राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात आज (२३ फेब्रुवारी) मुंबईतील विधानभवनात राज्यपालांच्या अभिभाषणाने झाली. त्यानंतर दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली वाहून अधिवेशनाची सुरुवात झाली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सभागृहात शोकप्रस्ताव मांडत अजितदादांबद्दलच्या आठवणींना उजाळा दिला. अजित पवार म्हणजे ‘महाराष्ट्राला कधीही न मिळालेला उत्तम मुख्यमंत्री’, अशा शब्दांत फडणवीसांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शोक प्रस्तावावर बोलतांना अजित पवारांविषयी असलेल्या आपल्या आठवणी सांगितल्या.

- Advertisement -

यावेळी ते म्हणाले, अधिवेशनाचा आज पहिला दिवस हा गेली २२ ते २३ वर्ष काम करत असताना सर्वांसाठी प्रचंड दुःखाचा दिवस आहे. आपल्या एका सहकार्याबाबत बोलण्याची वेळ येणे हे दुःखद आहे, त्यातही अजित पवारांसारखा नेता असेल तर ते अति दुःखद आहे. अजितदादांच्या जाण्याची पोकळी कधीच भरू शकत नाही. त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. आज त्यांची पावलो पावली उणीव भासत आहे. काल पत्रकार परिषदेला ते नव्हते. शिवनेरी किल्ल्यावर शिवजयंतीला देखील ते नव्हते. आज सभागृहात देखील ते नाही. हे दुःखद आहे, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटले.

YouTube video player

हे देखील वाचा : Devendra Fadnavis : “अजितदादा आपल्यात नसल्याची खंत, ते खऱ्या अर्थाने माझे…”; शोक प्रस्तावावर बोलतांना CM फडणवीसांनी जागवल्या आठवणी

पुढे ते म्हणाले, “ज्या दिवशी अजित पवार गेले त्यादिवशी प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू होते. लाख गेले तरी चालतील लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. नियती समोर ते जिंकू शकले नाही. लाखो अनुयायांना ते पोरके करून गेले. या घटनेने पवार कुटुंबावर काळाने घाला घातला. मी देखील हे दुःख अनुभवल आहे. माझी दोन मुले अपघातात गेली, माझे गुरु आनंद दिघे यांना देखील अपघातात मी गमावलं.अजित दादा आपल्यासोबत नाही हे मान्य होतं नाही. शब्द आणि वेळेला महत्व देणारा नेता आपण गमावला आहे, असेही त्यांनी म्हटले.

तसेच “अजितदादांच्या बोलण्यात ग्रामीण बाज होता. अजूनही त्यांचे एकनाथराव हे शब्द जात नाहीत. अर्थसंकल्पीय अधिवेशन म्हणजे दादांचे अधिवेशन. आमदारांच्या फाईलमध्ये अडकलेले दादा डोळ्यासमोर येतात. त्यांनी ११ वेळा अर्थसंकल्प सादर केला. खऱ्या अर्थाने ते विक्रमवीर होणार होते. मात्र, नियतीला ते मान्य नव्हते”, असे म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अजित पवारांसोबत असलेल्या आठवणींना उजाळा दिला.

ताज्या बातम्या

Devendra Fadnavis : मी जेव्हा विरोधी पक्षनेता होतो, तेव्हा…; अजितदादांबाबत भाषण...

0
मुंबई । Mumbai महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आज, २३ फेब्रुवारी रोजी शोकपूर्ण वातावरणात सुरुवात झाली. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज राज्याचा अर्थसंकल्प मांडणार होते,...