Saturday, May 9, 2026
Homeब्रेकिंग न्यूजMaharashtra Politics : शिवशक्ती-भीमशक्ती युतीची घोषणा; शिंदेंची शिवसेना आणि आनंदराज आंबेडकरांची रिपब्लिकन...

Maharashtra Politics : शिवशक्ती-भीमशक्ती युतीची घोषणा; शिंदेंची शिवसेना आणि आनंदराज आंबेडकरांची रिपब्लिकन सेना एकत्र

मुंबई | Mumbai

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्याआधी (Local Body Election) शिंदेंची शिवसेना आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर (Anandraj Ambedkar) यांच्या रिपब्लिकन सेनेची युती झाली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर यांनी युतीची घोषणा केली.

- Advertisement -

येत्या नोव्हेंबर-डिसेंबरच्या दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षाकडून तयारी सुरु असून, शिंदेंच्या शिवसेनेने (Shinde Shivsena) देखील आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेशी (Republican Sena) युती केली आहे. या युतीच्या माध्यमातून मराठी आणि दलित मते आपल्याकडे खेचण्याची खेळी एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) खेळल्याची चर्चा आहे.

यावेळी बोलतांना उपमुख्यमंत्री (DCM) एकनाथ शिंदे म्हणाले की, “दोन्ही सेना एकत्र येत आहेत. त्यामुळेच आजचा दिवस अतिशय आनंदाचा आहे. रस्त्यावर अन्यायाविरोधात लढणाऱ्या दोन संघटना आज सोबत येत आहेत. एक बाळासाहेबांची शिवसेना , तर दुसरी भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांची रिपब्लिकन सेना आहे. दोन्ही सेनाच असल्याने आमचं चांगलं जमेल”, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

पुढे ते म्हणाले की, “आनंदराज आंबेडकर आणि मी कायम कार्यकर्ता (Worker) म्हणून काम केले आहे. अडीच वर्ष मुख्यमंत्री असतानाही मी कॉमन मॅनच होतो. आता मी डीसीएम म्हणून डेडिकेटेड टू कॉमन मॅन झालो आहे. सामान्य माणूस, सामान्य कार्यकर्ता हीच आपली ओळख आहे. आपली बांधिलकी सामान्य माणसाशी आहे. सर्वसामान्य माणसाशी आपली नाळ जोडलेली आहे,” असेही एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

तर आनंदराज आंबेडकर म्हणाले की, “महाराष्ट्रात (Maharashtra) ही युती आजची नाही भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रबोधनकार ठाकरे यांच्यापासून सुरु झालेली युती आहे. खऱ्या अर्थाने महाराष्ट्रात राजकीय, सामाजिक परिवर्तन घडवण्यासाठी आम्ही दोन्ही कार्यकर्ते एकत्र आले आहोत. मी मुद्दाम कार्यकर्ते बोललो कारण एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना कार्यकर्ता म्हणून प्रत्येक तळागाळातल्या व्यक्तीशी त्यांच्या सुखदु:खाशी एकरुप होण्याचा प्रयत्न केला,” असे त्यांनी म्हटले.

तसेच “अशा कार्यकर्त्याबरोबर महाराष्ट्रातला प्रचंड मोठा आंबेडकरी समाज जो आतापर्यंत अनेक वर्ष रस्त्यावर लढाई लढत आला. त्या कार्यकर्त्याला आतापर्यंत काही मिळाले नाही. या कार्यकर्त्याला सध्याच्या होणार्‍या स्थानिक निवडणुकीमध्ये (Election) आंबेडकरी कार्यकर्त्याला सत्तेचा लाभ मिळावा, यासाठी आम्ही दोघांनी एकत्र यायचं ठरवलं,” असेही आनंदराज आंबेडकर म्हणाले.

ताज्या बातम्या

राष्ट्रीय पंचायत पुरस्कार जाहीर : चांदवड तालुक्यातील निंबळे ग्रामपंचायतीचा ‘सुशासन’ श्रेणीत...

0
नवी दिल्ली | वृत्तसंस्था केंद्रीय पंचायती राज मंत्रालयाने आज जाहीर केलेल्या 'राष्ट्रीय पंचायत पुरस्कार २०२५' मध्ये महाराष्ट्राने आपल्या यशाच्या पाऊलखुणा उमटवत राष्ट्रीय स्तरावर बाजी मारली...