Tuesday, March 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजMaharashtra Politics : भाजपकडून पुन्हा धक्कातंत्र; रविंद्र चव्हाण नवे प्रदेशाध्यक्ष होणार?

Maharashtra Politics : भाजपकडून पुन्हा धक्कातंत्र; रविंद्र चव्हाण नवे प्रदेशाध्यक्ष होणार?

मुंबई | Mumbai

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारचा (Mahayuti Government) आज रविवारी नागपूरमध्ये मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार होणार आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात भाजपचे १९, शिवसेनेचे ११ आणि राष्ट्रवादीचे ९ मंत्री शपथ घेणार आहेत. आज सकाळपासूनच महायुतीमधील घटक पक्षांतील आमदारांना फोन करून मंत्रिपदाच्या शपथविधीसाठी तयार राहण्यास सांगण्यात आले आहे. यात भाजपच्या १९ आमदारांना मंत्रि‍पदासाठी फोन गेले आहेत. यामध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना देखील मंत्रिपदासाठी फोन आला आहे. त्यामुळे त्यांच्याकडील प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे सोपवली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

- Advertisement -

मागील महायुती सरकारमध्ये एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात मंत्रि‍पदी राहिलेले रविंद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांना भाजपकडून नवीन जबाबदारी देण्याची शक्यता आहे. रविंद्र चव्हाणांचे नाव भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी आघाडीवर आहे. त्यामुळे त्यांची प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. ठाणे आणि कोकणमध्ये महाविकास आघाडीचा बालेकिल्ला उध्वस्त करण्यात चव्हाण यांची महत्वाची भूमिका होती. त्यामुळे आता रविंद्र चव्हाण यांना भाजपच्या महाराष्ट्राची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे.

दरम्यान, सध्या भाजपचे प्रदेशाध्यक्षपद चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांच्याकडे आहे. मात्र फडणवीस सरकारच्या काळात चंद्रशेखर बावनकुळे देखील मंत्री होणार आहे. त्यामुळे रविंद्र चव्हाण यांच्याकडे भाजप प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देण्याची शक्यता आहे. २०२९ मध्ये शतप्रतिशत भाजपसाठी रविंद्र चव्हाणांकडे ही जबाबदारी देण्यात येणार असल्याचे समजते. रविंद्र चव्हाण यांनी शिंदे सरकारच्या काळात सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून काम पाहिले होते.

रविंद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द

रविंद्र चव्हाण हे २००७ मध्ये भाजपचे नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तसेच त्यांनी २००७ मध्ये काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता असतानाही भाजप नगरसेवक असूनही स्थायी समितीचे सभापती होण्याचा मान मिळवला होता. तर २००९ मध्ये तत्कालीन भाजप आमदार हरिश्चंद्र पाटील यांचे तिकीट कापून त्यांना भाजपची उमेदवारी देण्यात आली होती. यानंतर २०१४ मध्ये ते सलग दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आले होते. तसेच २०१५ ते २०१६ मध्ये कल्याण डोंबिवली, मीरा भाईंदर, उल्हासनगर, ठाणे, पनवेल, महापालिकेत भाजपचा बोलबाला, कर्जत, माथेरान, बदलापूरमध्ये भाजपला यश मिळाले होते. त्यामुळे त्यांना राज्यमंत्री आणि रायगड व पालघरचे पालकमंत्रीपद मिळाले होते. यानंतर ते २०१९ मध्ये तिसऱ्यांदा तर २०२४ मध्ये चौथ्यादा डोंबिवलीतून आमदार (MLA) झाले. तसेच चव्हाण यांचा २०२१ मध्ये शिंदे भाजप सरकार आणण्यात मोलाचा वाटा होता.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

default-featured-image

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी तेलंगणा येथून...