Sunday, September 27, 2026
Homeमुख्य बातम्याRaj Thackeray : एसआयआर विरोधात 'या' तारखेला मुंबईत जनमोर्चा; मनसे-ठाकरे सेनेचा संयुक्त...

Raj Thackeray : एसआयआर विरोधात ‘या’ तारखेला मुंबईत जनमोर्चा; मनसे-ठाकरे सेनेचा संयुक्त पुढाकार, राज ठाकरेंची पोस्टद्वारे माहिती

मुंबई | Mumbai

देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार (Gyanesh Kumar) यांनी ‘स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन’ (एसआयआर) संदर्भातील काही निर्णय त्यांचे इतर दोन सहकारी सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी यांना विश्वासात न घेतल्याचा दावा ‘द इंडियन एक्स्प्रेस’ या वृत्तपत्राने केला होता. त्यानंतर विरोधकांनी ज्ञानेश कुमार यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. तर काही ठिकाणी ज्ञानेश यांच्या विरोधात आंदोलने सुरु झाली आहेत. यानंतर आता मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आणि शिवसेना (उबाठा) आक्रमक झाल्या असून, त्यांनी मुंबईत एका भव्य जनमोर्चाचे आयोजन केले आहे. (MNS and Shivsena UBT)

- Advertisement -

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Raj Thackeray) यांनी स्वत: याबाबत सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली आहे. त्यांनी पोस्टमध्ये म्हटले की, “देशातील सत्ताधारी पक्षाची जणू काही आपण शाखाच आहोत अशा पद्धतीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक आयोगाने (Election Commission) ‘एसआयआर’च्या नावाखाली मतदारांची जी घोर फसवणूक केली आहे. त्याविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना येत्या ४ ऑक्टोबर २०२६ ला मुंबईत एक जनमोर्चा काढणार आहे.

या मोर्चाच्या (Morcha) आयोजनात जरी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेचा पुढाकार असला तरी हा जनतेचा मोर्चा आहे आणि हा एका पक्षापुरता न राहता तो तमाम राजकीय व्यवस्थेचा आणि जनतेचा आवाज ठरेल यासाठी आम्ही सर्व राजकीय पक्षांना या मोर्चा मध्ये सहभागी होण्यासाठी संवाद साधणार आहोत.अर्थात महाराष्ट्रातील जनतेलाच आवाहन आहे की आपण मोठ्या संख्येने या मोर्च्यात सहभागी व्हा.बाकी मोर्च्याची वेळ आणि ठिकाण लवकरच कळवण्यात येईल.तेंव्हा एसआयआरविरोधातील या जन मोर्च्यात भेटूया ! या देशातील लोकशाही आणि या देशाचे संविधान वाचवण्यासाठी एकत्र या! असे आवाहन राज ठाकरेंनी पोस्टमधून केले आहे.

वेळ आणि ठिकाण लवकरच जाहीर होणार

४ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या या जनमोर्चीची निश्चित वेळ आणि मार्ग/ ठिकाण याबाबतची सविस्तर माहिती लवकरच अधिकृतपणे जाहीर केली जाईल. ‘एसआयआर’च्या नावाखाली होणाऱ्या अन्यायाविरोधात मुंबईत धडकणाऱ्या या मोर्चामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्या

Onion Rate : राहाता बाजार समितीत कांद्याला मिळाला सर्वाधिक भाव

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata रविवारी राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) कांदा आवक वाढली. कांद्याला प्रतिक्विंटल सर्वाधिक 4800 रुपयांपर्यंत भाव मिळाला. कांद्याची 2558 गोण्यांची...