Wednesday, January 7, 2026
Homeब्रेकिंग न्यूजVideo : विरोधकांचे विधानभवनाच्या पायऱ्यांवर टॉवेल-बनियनवर आंदोलन; शिंदेंच्या शिवसेनेला डिवचलं

Video : विरोधकांचे विधानभवनाच्या पायऱ्यांवर टॉवेल-बनियनवर आंदोलन; शिंदेंच्या शिवसेनेला डिवचलं

मुंबई | Mumbai

शिंदेंच्या शिवसेनेचे (Shinde Shivsena) आमदार संजय गायकवाड (MAL Sanjay Gaikwad) यांनी आमदार निवासमध्ये टॉवेल-बनियनवर कर्मचाऱ्याला मारहाण केल्यानंतर राज्यात (State) संतापाची लाट निर्माण झाली आहे. याप्रकरणी आमदार गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा (Case) दाखल करण्यात आला होता. यानंतर राज्याचे मंत्री संजय शिरसाट यांचाही एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओत संजय शिरसाट हे बनियनवर दिसून आले होते.

- Advertisement -

त्यानंतर आज (दि.१६) रोजी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aaghadi) नेत्यांनी बनियन-टॉवेलवर आंदोलन करत सत्ताधाऱ्यांचे चांगलेच लक्ष वेधून घेतले. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, जितेंद्र आव्हाड, भास्कर जाधव, सतेज पाटील, सचिन अहिर, महेश सावंत आदी नेत्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यांनी महाराष्ट्राची (Maharashtra) लूट करणाऱ्या चड्डी बनियन गँगचा धिक्कार असो, महाराष्ट्राची सुरूय लूट, चड्डी बनियन गँगला सूट’, ‘खोक्यांची वाढलीय मस्ती, चड्डी बनियन गँगची पहा कुस्ती, अशा आशयाचे फलक हातात धरले होते.

YouTube video player

दरम्यान, विधानसभेचे पावसाळी अधिवेशन (Monsoon Session) संपण्यासाठी तीन दिवसांचा कालावधी राहिलेला आहे. विरोधीपक्षांनी विधानसभा अध्यक्षांना विरोधी पक्षनेत्याची (Leader of Opposition) निवड करण्यासाठी पत्र दिलेले आहे. मात्र अद्याप विरोधी पक्षनेत्याची निवड करण्यात आलेली नाही. त्यामुळे येत्या दोन दिवसांत विरोधी पक्षनेत्याची निवड होते का? हे बघणे महत्वाचे असणार आहे.

ताज्या बातम्या

Nashik Accident News : चाचडगाव टोलनाक्याजवळ ईरटीका-स्कॉर्पिओचा भीषण अपघात; चौघे जागीच...

0
दिंडोरी | Dindori तालुक्यातील नाशिक-पेठ रस्त्यावरील (Nashik-Peth Road) चाचडगाव टोलनाक्याजवळ (Chachadgaon Toll Plaza) ईरटीका आणि स्कॉर्पिओचा भीषण अपघात (Ertika-Scorpio Accident) झाल्याची घटना घडली आहे. या...