Thursday, March 13, 2025
Homeब्रेकिंग न्यूजManikrao Kokate : "राष्ट्रवादीने त्यांचे खूप लाड..."; मंत्री कोकाटेंनी भुजबळांना पुन्हा डिवचलं

Manikrao Kokate : “राष्ट्रवादीने त्यांचे खूप लाड…”; मंत्री कोकाटेंनी भुजबळांना पुन्हा डिवचलं

नाशिक | Nashik

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे मंत्रिपद न मिळाल्यामुळे पक्षात नाराज आहेत. त्यांनी वेळोवेळी माध्यमांद्वारे आपली नाराजी बोलून दाखवली आहे. नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) राष्ट्रवादीच्या वाट्याला दोन मंत्रि‍पदे आली आहेत. त्यामध्ये एक दिंडोरीचे आमदार नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) यांना तर दुसरे सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांना मिळाले आहे. आमदार भुजबळ यांना आपल्याला मंत्रिपद मिळेल अशी आशा होती. मात्र, त्यांच्याऐवजी कोकाटेंना मंत्रिपद दिले गेले, यामुळे भुजबळ हे काहीसे नाराज आहेत. तर दुसरीकडे कोकाटे यांना मंत्रिपद मिळाल्याने ते चांगलेच जोमात आहेत. त्यामुळे कोकाटे हे भुजबळांना टोला लगावण्याची एकही संधी सोडतांना दिसत नाहीत.

- Advertisement -

काही दिवसांपूर्वी मंत्री कोकाटे यांनी माध्यमांशी बोलतांना “भुजबळांना ओबीसी म्हणून त्यांचा मुलगा आणि त्यांचा पुतण्या एवढेच दिसत असेल. दुसरे ओबीसी दिसत नसतील तर त्याला काय करणार? चूक असेल तर समजूत काढणार ना, चूकच नसेल तर समजूत कशाची काढणार? भुजबळांना मंत्रिपद न देऊन आमच्या पक्षाने कुठल्याही प्रकारची चूक केलेली नाही. आमच्या पक्षाने जो न्याय भुजबळांना दिला तो आतापर्यंत कोणत्याही पक्षाने दिला नाही”, असे म्हणत भुजबळांवर निशाणा साधला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा मंत्री कोकाटे यांनी छगन भुजबळांवर टीका केली आहे.

यावेळी बोलतांना मंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) म्हणाले की, “छगन भुजबळ नाराज असल्याचे म्हणत असतील, तरी मला तसे वाटत नाही. पक्षाने छगन भुजबळ यांचे खूप लाड केले आहेत. त्यांचे अजून किती लाड करायचे? जो जे वांच्छिल ते तो लाभो. त्यांना कुठे जायचे तिकडे जाऊद्या. माझे नेते अजित पवार आहेत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आमचे नेते असून माझे दुसरे कोणीही नेते नाहीत”, असे त्यांनी म्हटले.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून छगन भुजबळ यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासोबत जवळीक वाढत असल्याचे दिसून येत आहे. भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि भुजबळ यांची दोनदा भेट झाली आहे. तर नुकतीच पुण्यातील एका कार्यक्रमात छगन भुजबळ आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) एकत्र आले होते. या कार्यक्रमाच्या पत्रिकेवर एक संदेश लिहिला होता तो संदेश छगन भुजबळ यांनी वाचला. त्यामुळे छगन भुजबळ राष्ट्रवादी अजित पवार गटातच राहणार की? वेगळा निर्णय घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Dadasaheb Khindkar : धनंजय देशमुखांचा साडू पोलिसांना शरण; तरुणाला केली होती...

0
मुंबई | Mumbai मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर बीड येथील मारहाणीचे विविध व्हिडीओ व्हायरल होत आहेत. सगळ्यात आधी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांना (Santosh Deshmukh) मारहाण...