Sunday, June 14, 2026
Homeमुख्य बातम्याRohit Pawar : आमचा तेजस्वी सूर्य अस्ताला गेला! काकांच्या अकाली निधनानंतर आमदार...

Rohit Pawar : आमचा तेजस्वी सूर्य अस्ताला गेला! काकांच्या अकाली निधनानंतर आमदार रोहित पवारांची भावनिक पोस्ट

मुंबई | Mumbai

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar Death) यांचं काल (बुधवारी) बारामती येथे एका भीषण विमान अपघातात मृत्यू झाला. आज (गुरुवारी) बारामतीमधील (Baramati) विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांना निरोप देताना सर्वांचाच कंठ दाटून आला होता. यावेळी त्यांचे पुतणे आणि कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनाही अश्रू अनावर झाल्याचे दिसून आले. त्यानंतर आता त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : मोठी बातमी! उपमुख्यमंत्री अजित पवारांचा विमान अपघातात मृत्यू

रोहित पवारांनी (Rohit Pawar) पोस्टमध्ये म्हटले की, “महाराष्ट्रावर (Maharashtra) विकासाचा प्रकाश पाडण्याच्या ध्यासाने रोज सूर्योदयापूर्वीच उगणारा आमचा तेजस्वी सूर्य अस्ताला गेला! या सूर्याला अखेरचा निरोप देण्यासाठी आणि पवार कुटुंबाला आधार देण्यासाठी आज बारामतीत राज्य आणि देशभरातून आलेले मा. अजितदादांवर प्रेम करणारे सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सामान्य माणसं यांचं ऋण पवार कुटुंब कदापि विसरणार नाही,” असं ते म्हणाले आहेत.

दरम्यान, अजित पवारांच्या अंत्यविधीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन, नितीन गडकरी, रामदास आठवले, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह अनेक मोठे नेते उपस्थित होते. तर पंतप्रधान मोदींनी काल (बुधवारी) शरद पवारांशी फोनवरून संवाद साधत त्यांचे सांत्वन केले होते.

हे देखील वाचा : Ajit Pawar Funeral : अलविदा दादा! उपमुख्यमंत्री अजित पवार अनंतात विलीन; शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होणार?

अजित पवारांच्या जाण्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये नेतृत्वाची मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यामुळे पुढील काळात
राष्ट्रवादीची दिशा, निर्णय प्रक्रिया आणि राजकीय रणनीती काय असेल? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यातच राष्ट्रवादीचे मंत्री नरहरी झिरवाळ यांनी अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करावे, अशी मागणी केली आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या असून, त्या पुढे एकत्र असतील यात शंका नाही. अजित पवारांचा उत्तराधिकारी सुनेत्रा वहिनी असल्या पाहिजे. त्यामुळे राष्ट्रवादीची धुरा आता त्याच सांभाळतील ही सर्वांचीच भावना आहे,” असं त्यांनी म्हटले आहे.

हे देखील वाचा : Sanjay Raut : भाजपकडून पानभर जाहिराती देत अजितदादांना श्रद्धांजली, खासदार राऊत भडकले; म्हणाले, “७० हजार कोटीचा आरोप…”

पटेल, भुजबळांनी सुनेत्रा पवारांची भेट घेतल्याची चर्चा

अजित पवारांचा अंत्यविधी झाल्यानंतर पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळांनी सुनेत्रा पवारांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्यांना या दोन्ही नेत्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी तुम्ही स्वीकारावी अशी गळ घातल्याचे बोलले जात आहे. भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेने उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवारांचा विचार केला जावा असा प्रस्ताव ठेवण्यासंदर्भात चर्चा झाल्याचे सांगितले जाते. त्यामुळे असे जर झाले तर सुनेत्रा पवार या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरतील.

हे देखील वाचा : NCP Politics : सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करा; राष्ट्रवादीच्या ‘या’ मंत्र्याची मागणी, पडद्यामागे जोरदार हालचाली

ताज्या बातम्या

Udaipur Intercity Express accident : मोठी दुर्घटना! आग लागल्याची अफवा पसरल्याने...

0
उदयपूर । Udaipur भय आणि घबराट माणसाकडून काय करून घेईल याचा नेम नसतो, पण कधीकधी हीच घबराट प्राणांतिक ठरते, याचाच एक अत्यंत दुर्दैवी प्रत्यय मध्य...