Thursday, June 4, 2026
Homeब्रेकिंग न्यूजRohit Pawar : काकीसाठी पुतण्या मैदानात; आमदार रोहित पवारांनी घेतली काँग्रेस...

Rohit Pawar : काकीसाठी पुतण्या मैदानात; आमदार रोहित पवारांनी घेतली काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांची भेट, बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होणार?

मुंबई | Mumbai

राज्यातील बारामती आणि राहुरी विधानसभेच्या (Baramati and Rahuri Assembly) पोटनिवडणुकीसाठी येत्या २३ एप्रिल रोजी मतदान होईल. त्यानंतर ०४ मे रोजी या दोन्ही पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर केला जाईल. आज (गुरुवारी) दोन्ही ठिकाणी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असून, मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. या पोट निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची मुंबईत भेट घेतली. यावेळी रोहित पवारांनी बारामतीमधून काँग्रेसने माघार घ्यावी, अशी विंनती सपकाळ यांना केली. त्यामुळे आज दुपारपर्यंत बारामतीचे चित्र स्पष्ट होईल.

- Advertisement -

आमदार रोहित पवारांनी (MLA Rohit Pawar) भेट घेतल्यानंतर हर्षवर्धन सपकाळ यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी फोन करून उमेदवारी अर्ज मागे घेण्याची विनंती केली. तसेच आमदार रोहित पवारांनी देखील भेट घेऊन अर्ज मागे घ्यावा, अशी विनंती केली. त्यामुळे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी बोलून बारामतीचा उमेदवार मागे घेण्यासंदर्भात निर्णय घेऊ, असे हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले. तसेच माघारीसाठी आमच्या अटीशर्थी चुकीच्या नाहीत. १५ मार्च ते ५ एप्रिलपर्यंत आमच्याशी कुणीही संपर्क साधला नाही. वैचारिक पातळीवर लढणे ही आमची भूमिका असून, भाजपने सोयीचे बोलणे टाळावे असे त्यांनी म्हटले .

तर रोहित पवारांनी म्हटले की, आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Sapkal) यांची भेट घेऊन बारामतीचा उमेदवार मागे घेण्याबाबत चर्चा केली. या चर्चेला सपकाळ यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, त्यांच्या पक्षातील वरिष्ठ नेत्यांशी बोलून ते सकारात्मक निर्णय घेतील, असे त्यांनी सांगितले. तसेच पार्थ पवार यांनी काँग्रेसबाबत केलेल्या विधानाबाबत देखील सपकाळ यांच्याकडे दिलगिरी व्यक्ती केली असल्याचे रोहित पवारांनी म्हटले.

दरम्यान काल (बुधवारी) बिग बॉस फेम अभिजित बिचुकले, करुणा मुंडे यांच्यासह एकूण ५३ उमेदवारांपैकी सहा उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे अजून ४७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यानंतर आज शेवटच्या दिवशी माघारीच्या शेवटच्या क्षणापर्यंत नेमकं काय घडते हे बघणे महत्वाचे असणार आहे.

बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध करावी

आज (गुरुवारी) उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले की, बारामतीची जागा अपघाताने रिक्त झाली आहे. कर्तृत्त्ववान प्रतिनिधी महाराष्ट्रातून गेला आहे. त्यामुळे ही पोटनिवडणूक काँग्रेसने बिनविरोध करावी, असे शरद पवार यांनी म्हटले.

सुनेत्रा पवारांविरोधात काँग्रेसचे आकाश मोरे रिंगणात

बारामती पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने आकाश मोरे यांना उमेदवारी दिली आहे. मोरे हे काँग्रेसच्या विचारधारेने प्रेरित असून ते बारामती (पुणे जिल्हा) परिसरात सक्रिय आहेत. माजी आमदार विजयराव मोरे यांचे ते सुपुत्र आहेत. आकाश मोरे हे वकील असून,त्यांनी कायद्याचे शिक्षण पूर्ण केले आहेत. विविध सामाजिक आणि कायदेशीर प्रश्नांवर ते काम करतात. त्यांनी २०१४ ची विधानसभा निवडणूक काँग्रेस पक्षाच्या तिकीटावर बारामती मतदारसंघातून निवडणूक लढवली होती.

ताज्या बातम्या

पडसाद : आधीच विकासाची हौस, त्यात खरोखरीचा आला पाऊस

0
नाशिक | शैलेंद्र तनपुरे | Nashik यंदाच्या हंगामातील पहिल्याच पावसाने (Rain) नाशिककरांची आणि प्रशासनाचीही चांगलीच दाणादाण उडविली. 'आधीच हौस त्यात पाऊस' या उक्तीची प्रचिती आली....