Wednesday, January 7, 2026
Homeब्रेकिंग न्यूजSatyacha Morcha : आजचा मोर्चा राग, ताकद दाखवण्याचा अन् दिल्लीला सांगण्याचा -...

Satyacha Morcha : आजचा मोर्चा राग, ताकद दाखवण्याचा अन् दिल्लीला सांगण्याचा – राज ठाकरे

मुंबई | Mumbai

मतदार यादीतील घोळ, दुबार नावे आणि मतचोरीच्या आरोपांवरून आज (०१ नोव्हेंबर) रोजी मविआसह मनसेच्या वतीने मुंबईत निवडणूक आयोगाविरोधात ‘सत्याचा मोर्चा’ या टॅगलाइन खाली फॅशन स्ट्रीट ते मेट्रो सिनेमामार्गे हा मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर मुंबई महापालिकेच्या प्रवेशद्वारावर थांबविण्यात आला आहे. या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार, शिवसेना ठाकरे पक्षाचे उद्धव ठाकरे, मनसेप्रमुख राज ठाकरे, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्यासह आदी नेते उपस्थित होते.

- Advertisement -

यावेळी राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले की,”आजचा मोर्चा हा राग आणि ताकद दाखवण्याचा असून, दिल्लीला समजावून सांगण्याचा हा मोर्चा आहे. मतदार यांद्यामध्ये दुबार मतदार आहेत. उद्धव ठाकरे, शरद पवार दुबार मतदार असल्याचे सांगत आहेत.

YouTube video player

बोलत आहेत. यात दुबार मतदार आहेत, असे सांगत आहोत. शेतकरी कामगार पक्ष बोलत आहे. कम्युनिस्ट पार्टी, काँग्रेसचे लोक बोलत आहेत. भाजप, शिंदेचे लोकही मान्य करतात की दुबार मतदार आहेत. त्यामुळे असे असेल तर अडवले कोणी? निवडणुका मतदार याद्या स्वच्छ झाल्यावरच घ्या. आम्ही सगळे बोलतो यात दुबार मतदार आहे. मग निवडणूक घेण्याची घाई कोणाची? असा प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थित केला.

पुढे ते म्हणाले की, कल्याण ग्रामीण, डोंबिवली, भिवंडी आणि मुरबाड भागात ४ हजार ५०० मतदार हे दुबार आहेत. इकडच्या मतदारांनी मलबार हिल मतदारसंघातही मतदान केले असे म्हणत त्यांनी मंचावर ठेवलेली दुबार मतदानाच्या यादींचे गठ्ठे दाखवले. एवढ दाखवून देखील जी माणसे भरली आहेत ना त्यांच्यात निवडणूक आटोपती घेऊन निवडणूक जिंकायची आहे. पैठणचा आमदार मुलगा सांगतो २० हजार बाहेरून आणले. मी २०१७ पासून सांगतो मतचोरी झाली आहे. जेव्हा निवडणूक होतील तेव्हा सर्वांच्या घरी जा मतदार यादीतील लोकं ओळखा आणि जर दुबार तिबार आले तर, फोडून काढा मग पोलिसांनाकडे द्या तेव्हाच त्यांना कळेल. मतदारांनी मतदान करायचं, सगळं करायचं, पण मॅच अगोदरचं फिक्स असेल तर निवडणुकीला काय अर्थ आहे?, असेही राज ठाकरेंनी म्हटले.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : ‘लोकशाही’च्या बळकटीसाठी मतदारांचे योगदान महत्त्वाचे – जीवने

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar महानगरपालिका निवडणूक ही लोकशाही बळकट करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची असून या प्रक्रियेत मतदारांचे योगदान महत्वाचे आहे. मनपा स्वीप समितीचे विविध नियोजित उपक्रम हे...