Friday, January 23, 2026
Homeनाशिकमोठी बातमी! १४७ नगरपंचायती, २४७ नगरपालिकांच्या अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; शिर्डी, भुसावळ, ओझर...

मोठी बातमी! १४७ नगरपंचायती, २४७ नगरपालिकांच्या अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; शिर्डी, भुसावळ, ओझर ‘या’ प्रवर्गासाठी आरक्षित

भगूर, इगतपुरी, सटाणा ओबीसी महिला प्रवर्गासाठी आरक्षित

मुंबई | Mumbai

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या (Local Body Election) पार्श्वभूमीवर आज (सोमवारी) राज्यातील २४७ नगरपालिका आणि १४७ नगरपंचायतींमधील नगराध्यक्षपदाचे आरक्षण (Reservation) जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार ३३ नगरपरिषदांपैकी १७ नगरपरिषदांमध्ये अनुसूचित जातीच्या महिलांना आरक्षण जाहीर झाले आहे. तर ३४ नगरपरिषदांमधील नगराध्यक्षपद हे ओबीसी महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. या आरक्षणामुळे मिनी विधानसभेवर महिलाराज येणार आहे.

- Advertisement -

सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) जानेवारी महिना संपण्याच्या आधी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे (Local Government elections) निर्देश राज्य सरकारला दिले होते. त्यानंतर प्रशासन वेगाने तयारीला लागले आहे. आज (दि.०६ ऑक्टोबर) रोजी मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील परिषद सभागृह येथे मंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची सोडत काढण्यात आली. आज जाहीर झालेल्या आरक्षणामुळे कोणत्या राजकीय पक्षाला फायदा आणि तोटा होईल? हे निवडणुकीवेळी स्पष्ट होईल.

YouTube video player

अनुसूचित जाती महिला आरक्षण 

देऊळगावराजा – महिला प्रवर्ग आरक्षित

मोहोळ – महिला प्रवर्ग आरक्षित

तेल्हारा – महिला प्रवर्ग आरक्षित

ओझर – महिला प्रवर्ग आरक्षित

वानाडोंगरी – महिला प्रवर्ग आरक्षित

भुसावळ – महिला प्रवर्ग आरक्षित

घुग्गूस – महिला प्रवर्ग आरक्षित

चिमूर – महिला प्रवर्ग आरक्षित

शिर्डी – महिला प्रवर्ग आरक्षित

सावदा- महिला प्रवर्ग आरक्षित

मैनदर्गी – महिला प्रवर्ग आरक्षित

दिगडोहदेवी – महिला प्रवर्ग आरक्षित

दिग्रस- महिला प्रवर्ग आरक्षित

अकलूज – महिला प्रवर्ग आरक्षित

बीड – महिला प्रवर्ग आरक्षित

शिरोळ – महिला प्रवर्ग आरक्षित

अनुसूचित जमाती आरक्षण

भडगाव (जळगाव) – अनुसूचित जमाती प्रवर्ग

वणी – अनुसूचित जमाती प्रवर्ग

पिंपळनेर (धुळे) – अनुसूचित जमाती प्रवर्ग

उमरी (नांदेड) -अनुसूचित जमाती प्रवर्ग

यवतमाळ – अनुसूचित जमाती प्रवर्ग

शेंदूरजनघाट -अनुसूचित जमाती प्रवर्ग

ओबीसी प्रवर्गासाठी

भगूर – ओबीसी महिला

इगतपुरी – ओबीसी महिला

सटाणा- ओबीसी महिला

विटा – ओबीसी महिला

बल्हारपूर – ओबीसी महिला

धाराशिव – ओबीसी महिला

भोकरदन – ओबीसी महिला

जुन्नर – ओबीसी महिला

उमरेड – ओबीसी महिला

दौडं – ओबीसी महिला

कुळगाव बदलापूर – ओबीसी महिला

हिंगोली – ओबीसी महिला

फुलगाव – ओबीसी महिला

मुरुड जंजीरा – ओबीसी महिला

शिरूर – ओबीसी महिला

काटोल – ओबीसी महिला

माजलगाव – ओबीसी महिला

मूल – ओबीसी महिला

मालवण – ओबीसी महिला

देसाईगंज – ओबीसी महिला

हिवरखेड – ओबीसी महिला

अकोट – ओबीसी महिला

मोर्शी – ओबीसी महिला

नेर- नवाबपूर – ओबीसी महिला

औसा – ओबीसी महिला

कर्जत – ओबीसी महिला

देगलूर – ओबीसी महिला

चोपडा – ओबीसी महिला

दोंडाईचा वरवडे – ओबीसी महिला

बाळापूर – ओबीसी महिला

रोहा – ओबीसी महिला

कुरडुवादी – ओबीसी महिला

धामणगाव,रेल्वे – ओबीसी महिला

वरोरा – ओबीसी महिला

ताज्या बातम्या

एकनाथ

KDMC मध्ये मनसेच्या पाठिंब्याबाबत एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, मनसेने विकासाच्या...

0
मुंबई | Mumbaiशिवसेनापक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज (शुक्रवार, 23 जानेवारी) 100 वी जयंती आहे. या निमित्ताने राज्यभरात शिवसैनिकांनी विविध कार्यक्रमांचे आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन...