Friday, January 23, 2026
Homeब्रेकिंग न्यूजMaharashtra Politics : राष्ट्रवादीच्या साप्ताहिक बैठकांच्या आयोजनाची जबाबदारी मंत्र्यांवर

Maharashtra Politics : राष्ट्रवादीच्या साप्ताहिक बैठकांच्या आयोजनाची जबाबदारी मंत्र्यांवर

मुंबई | प्रतिनिधी | Mumbai

गेल्या काही महिन्यांपासून मुंबईत सुरु असलेल्या पावसाचा फटका उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या ‘देवगिरी’ या शासकीय निवासस्थानी होणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या साप्ताहिक बैठकांना बसला आहे. पावसामुळे (Rain) बंगल्यावर बैठक आयोजित करण्यास अडचण येत असल्याने अजितदादांनी बैठकीच्या आयोजनाची जबाबदारी प्रत्येक मंत्र्यावर सोपवली आहे. त्यामुळे दर आठवड्याला एका मंत्र्याला बैठकीच्या आयोजनाची आणि त्यासाठी येणाऱ्या खर्चाची जबाबदारी उचलावी लागते.

- Advertisement -

अजित पवार (Ajit Pawar) यांनी दर मंगळवारी पक्षाची साप्ताहिक बैठक घेण्याचा दंडक घालून दिला आहे. त्यानुसार पवार यांच्या ‘देवगिरी’ निवासस्थानी पक्षाची बैठक होत होती. मंत्र्यांचे जनता दरबार झाल्यानंतर संध्याकाळी होणाऱ्या या बैठकीला पक्षाचे मंत्री, खासदार, आमदार, प्रदेशाध्यक्ष यांच्यासह निवडक महत्वाचे पदाधिकारी उपस्थित राहतात. या बैठकीत मंत्र्यांना विभागात येणाऱ्या अडचणींची माहिती घेतली जाते.

YouTube video player

तसेच आमदार (MLA) आपापल्या मतदारसंघातील महत्वाच्या प्रश्नांची चर्चा करतात. मात्र, अलीकडे मुंबईत (Mumbai) सुरु असलेल्या पावसामुळे ‘देवगिरी’ वर बैठका घेण्यात अडचणी येऊ लागल्या आहेत. त्यामुळे अजित पवार यांनी कोणत्या आठवड्यात कोणत्या मंत्र्यांवर साप्ताहिक बैठकीच्या आयोजनाची जबाबदारी असेल याचे वेळापत्रक तयार केले आहे.

त्यानुसार आज, मंगळवारच्या साप्ताहिक बैठकीची जबाबदारी मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांच्याकडे आहे. नरिमन पॉईंट येथील हॉटेल ‘ट्रायडण्ट’ मध्ये ही बैठक होत आहे. तर पुढील आठवड्यात बैठक आयोजित करण्याची जबाबदारी विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्यावर सोपवण्यात आली आहे. याआधी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे, राज्यमंत्री इंद्रनील नाईक हे साप्ताहिक बैठकीचे यजमान राहिले आहेत.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्ह्यात एक लाखांहून अधिक लाडक्या बहिणींची अडचण?

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या ऑनलाइन ई-केवायसी प्रक्रियेने नगर जिल्ह्यातही महिलांची डोकेदुखी वाढवली. त्यातच जानेवारी महिन्यात अनेक पात्र...