Wednesday, February 4, 2026
Homeब्रेकिंग न्यूजMaharashtra Politics : उद्धव ठाकरेंचे शिलेदार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; कारण काय?

Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंचे शिलेदार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; कारण काय?

मुंबई | Mumbai

आज (सोमवार) सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी भेट घेतली होती. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आले आहे. त्यानंतर आता ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे विश्वासू मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) माजी मंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी सागर बंगाल्यावर दाखल झाले आहेत.

- Advertisement -

उद्धव ठाकरे हे पुन्हा देवेंद्र फडणवीसांची जवळीक साधत असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहेत. त्यातच आता मिलिंद नार्वेकर, सुभाष देसाई आणि अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट (Meet) घेतल्याने चर्चांना उधाण आले आहे.

YouTube video player

दरम्यान, मुंबईत स्वर्गीय बाळसाहेब ठाकरे (Balsaheb Thackeray) यांचे जे स्मारक उभे राहत आहे त्याचे अध्यक्षपद कायम ठेवावे यासाठी ही भेट असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या या स्मारकाचे अध्यक्षपद ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंकडे (Uddhav Thackeray) आहे. ते कायम त्यांच्याकडेच असावे, याकरिता ही भेट असल्याचे सांगण्यात येत आहे.

ताज्या बातम्या

Rahata : लोणीचे हवालदार साळवी निलंबित; काय आहे कारण?

0
राहाता |प्रतिनिधी| Rahata राहाता तालुक्यातील ममदापूर येथे सुरू असलेल्या अवैध कत्तलखान्यांवर कारवाई करण्यास टाळाटाळ करणे आणि आरोपींशी आर्थिक हितसंबंध जोपासल्याचा ठपका ठेवत, लोणी पोलीस...