Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्यापडद्यामागे जोरदार हालचाली! अदानींनंतर आता उदय सामंत पवारांच्या भेटीसाठी सिल्वर ओकवर

पडद्यामागे जोरदार हालचाली! अदानींनंतर आता उदय सामंत पवारांच्या भेटीसाठी सिल्वर ओकवर

मुंबई | Mumbai

राज्यात सध्या वेगवान घडामोडी घडताना दिसत आहेत. गुरुवारी प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांनी शरद पवारांची भेट घेतली होती. त्यानंतर आता शिंदे गटाचे नेते आणि मंत्री उदय सामंत पवारांच्या भेटीसाठी सिल्वर ओकवर पोहोचले. अचानक भेट होत असल्याने राजकीय वर्तुळात याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

- Advertisement -

दरम्यान, पवार यांची भेट घेतल्यानंतर मीडियाशी बोलताना या भेटीबाबत स्पष्टीकरण दिले. या भेटी मागे कोणतेही राजकारण नाही. तसे कोणीही करु नये, असे उदय सामंत म्हणाले. अखिल भारतीय नाट्यपरिषदेची निवडणूक आहे. याची माहिती देण्यासाठी आपण पवार यांना भेटलो, असे सामंत यांनी यावेळी स्पष्ट केले. मात्र अदानी यांच्या भेटीच्या दुसऱ्याच दिवशी उदय सामंत हे शरद पवार यांच्या निवासस्थानी पोहोचल्यानं चर्चेला उधाण आलं आहे.

साईबाबा संस्थान विश्वस्त निवडीच्या हालचाली सुरू

तसेच यावेळी यावेळी काही प्रश्नांवर त्यांनी भाष्य केले. सत्तासंघर्षाची बाजु आमच्या वकीलांना चांगल्या पद्धतीने मांडली आहे. आमच्या वकीलांनी चांगल्या पद्धतीनं बाजू मांडली आहे. त्यामुळे योग्य तो निर्णय असं माझं मत आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतील आणि पुढचे मुख्यमंत्रीच असतील, असे सामंत म्हणाले. तसेच खारघर दुर्घटनेवर ते म्हणाले, करोनाच्या काळातील मृत्यू झाले. त्याचे गुन्हे कुणावर दाखल करायचे, असा सवाल केला.

निपचीत पडलेली महिला अन् प्रचंड चेंगराचेंगरी! जितेंद्र आव्हाडांनी शेअर केला भयावह VIDEO

मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण हे महत्त्वाचे मुद्दे आहेत. आम्ही विकास करण्यावर भर देत आहेत. त्यामुळे कोणी काहीही बोलले तरी आम्ही त्याकडे लक्ष देत नाही. कोण वृत्तपत्रातून टीका करत आहेत, ते सगळ्यांनाच माहित आहे. ते काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीवर टीका करत आहेत. त्याकडे लक्ष देण्याची गरज नाही. अजित पवार यांची विचारधारा वेगळी आहे. त्यांनी त्यांची विचारधारा बदलली तर त्यांच्याबाबत मुख्यमंत्री शिंदे आणि पंतप्रधान मोदी हे त्याबाबत निर्णय घेतील, असे सामंत म्हणाले.

पारा वाढला, महावितरणला घाम फुटला! वीजेच्या मागणीत विक्रमी वाढ

दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सर्व मंत्र्यांना मुंबईत हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. मंत्र्यांना मुंबईत का बोलावण्यात आलं आहे, याचं कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र या बातमीनं चर्चेला उधाण आलं आहे. एकनाथ शिंदे यांनी आपल्या सर्व मंत्र्यांना मुंबईत बोलावलं आहे. त्यामुळे मुंबईबाहेर असलेले सर्व मंत्री मुंबईच्या दिशेनं निघाले आहेत. आज दुपारी एक वाजण्यापूर्वी सर्व मंत्री मुंबईत हजर राहणार आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या