Thursday, November 14, 2024
Homeमहाराष्ट्रMaharashtra Rain Alert : राज्यात पुन्हा पावसाला सुरुवात! जाणून घ्या तुमच्या जिल्ह्याचा...

Maharashtra Rain Alert : राज्यात पुन्हा पावसाला सुरुवात! जाणून घ्या तुमच्या जिल्ह्याचा हवामान अंदाज

मुंबई । Mumbai

मागील पाच-सहा दिवसांपासून पावसानं उसंत घेतल्यानंतर शनिवारपासून पुन्हा एकदा पावसाची (Maharashtra Rain) जोरदार बॅटिंग पाहायला मिळत आहे. याचदरम्यान महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यामध्ये हवामान विभागाने विविध अलर्ट जारी केले आहेत.

- Advertisement -

मध्य महाराष्ट्राला हवामान विभागाने आज रेड अलर्ट जारी केला आहे. मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पालघर, पुणे, साता-यात रेड अलर्ट आहे. तर मुंबईतही आज पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबई, ठाणे, रत्नागिरी, सिधुदुर्ग, रायगड, नाशिक, या ठिकाणी ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. तर नागपूरमध्ये येलो अलर्ट आहे.

हे देखील वाचा : Nashik Rain News : जिल्ह्यात पावसाची संततधार; गंगापूर धरणाच्या पाणीपातळीत वाढ

दरम्यान, मागील आठवड्यात मुंबईत अतिवृष्टी झाली होती. यामुळं मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यात शाळा-महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली होती. तर मुंबईत सखल भागात पाणी तुंबलं होतं. याचा परिणाम रेल्वे वाहतूक आणि रस्त्यावरील वाहतुकीवर झाला होता. यामुळं नागरिकांची मोठी गैरसोय झाली होती.

सध्या राज्यात सर्वत्र पावसानं समाधानकारक हजेरी लावली आहे. शेतीची कामंही मोठ्या प्रमाणात झाली आहेत. तसेच राज्यातील धरणांमध्ये पाणीसाठा ६० टक्क्यांच्यावर साठला आहे. दरम्यान, पुढील तीन ते चार दिवस राज्यात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडणार आहे, अशी माहिती हवामानतज्ञ के. एस. होसाळीकर यांनी दिली. तसेच ज्या ठिकाणी रेड अलर्ट दिला आहे, तिथे गरज असेल तरच घराबाहेर पडा, अशा सूचना प्रशासनानं नागरिकांना दिल्या आहेत.

हे देखील वाचा : Video : पिंपळद-ब्राह्मणवाडे पुलावर पाणी; ग्रामस्थांचा जीव धोक्यात घालून प्रवास

दरम्यान खडकवासला धरणक्षेत्रात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळं (Heavy Rain) सध्या धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. त्यामुळे मुठा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. पुण्यातल्या डेक्कन परिसरात नदीच्या पाणीपातळीत वाढ झालीय. सिंहगड रस्त्यावरच्या एकता नगरमधल्या दोन सोसायट्यांमध्ये पाणी शिरल आहे..

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या