Wednesday, January 7, 2026
Homeब्रेकिंग न्यूजMaharashtra Rain Alert : राज्यात पाऊस पुन्हा धो-धो बरसणार; 'या' सात जिल्ह्यांना...

Maharashtra Rain Alert : राज्यात पाऊस पुन्हा धो-धो बरसणार; ‘या’ सात जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

मुंबई | Mumbai 

महाराष्ट्रात हवामान विभागाने आज (रविवार दि.१५ जून) रोजी जोरदार पावसाचा (Monsoon Update) इशारा दिला आहे. यात हवामान विभागाने कोकण–घाटमाथ्यावर रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी (Rain Update) केला आहे. तर राज्यभर वादळी वाऱ्यांसह विजांबरोबर पावसाची (Heavy Rain) शक्यता वर्तविण्यात आली आहे.

- Advertisement -

हवामान विभागाच्या (IMD) माहितीनुसार, राजस्थान आणि परिसरावर चक्राकार वारे वाहत असून, गुजरात ते उत्तर मध्य महाराष्ट्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. अरबी समुद्रापासून आंध्र प्रदेशाच्या किनाऱ्यापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम आहे. उत्तर अंतर्गत कर्नाटक आणि मराठवाडा परिसरातही चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. या हवामान प्रणालींमुळे राज्यात पावसाला (Rain) सुरुवात झाली आहे. त्यामुळे पुढील दोन ते तीन दिवस घाट विभागात अति जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

YouTube video player

दूसरीकडे आज (दि.१५) सकाळपासून मुंबईमध्ये (Mumbai) ढगाळ वातावरण आहे. रात्रीपासून अनेक ठिकाणी पाऊस बरसत असून, आयएमडीने मुंबईला आज येलो अलर्ट दिला आहे. तसेच अनेक मुंबईकरांनी सोशल मीडीयामध्ये #MumbaiRains सह फोटोज शेअर केले आहेत. मुंबईमध्ये मे महिन्यात जोरदार पाऊस कोसळला होता. त्यानंतर पाऊस दडी मारून बसला होता. यानंतर अखेर पुन्हा पावसाचे दमदार आगमन होतांना दिसत आहे.

कोणत्या जिल्ह्यांना कुठला अलर्ट

येलो अलर्ट : नाशिकसह मुंबई, जळगाव, अहिल्यानगर आणि विदर्भात विजांबरोबर मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.तसेच नाशिकसाठी पुढील दोन दिवस येलो अलर्ट देण्यात आला आहे.

रेड अलर्ट : आज रत्नागिरीसह कोकणात मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे गेल्या २४ तासांत रत्नागिरीमधील राजापुर येथे तब्बल २५० मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर सिंधुदुर्गमध्ये १०० मिमी इतका पाऊस झाला आहे.

ऑरेंज अलर्ट : पालघर–ठाणे–रायगड–सिंधुदुर्ग–पुणे, सातारा, कोल्हापूर घाटात जोरदार तुफानी वारे आणि जोरदार पाऊस बरसण्याची शक्यता असून, या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

Accident News : दुचाकी अपघातात आरोग्य सेवकाचा मृत्यू

0
पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner रांजणगाव रोड (Ranjangaon Road) उपकेंद्र येथे आरोग्य सेवक (Health Worker) म्हणून कार्यरत असलेले राम गुणवंतराव जाधव (वय 29) यांचा मंगळवारी (दि.6)...