Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यात आज ‘इतके’ रुग्ण करोनामुक्त

राज्यात आज ‘इतके’ रुग्ण करोनामुक्त

मुंबई –

राज्यात आतापर्यंत 13 लाख 16 हजार 769 रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. राज्यात आज

- Advertisement -

19 हजार 517 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्याचा रिकव्हरी रेट हा 84. 71 टक्के इतका झाला आहे. महाराष्ट्रात आज 10 हजार 552 नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर मागील 24 तासांमध्ये 158 रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यातील मृत्यू दर हा 2.63 टक्के इतका आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 78 लाख 38 हजार 318 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 15 लाख 54 हजार 389 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 23 लाख 80 हजार 957 व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत तर 23 हजा 176 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. राज्यात 1 लाख 96 हजार 288 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत. आज राज्यात 10 हजार 552 नवे करोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील करोनाग्रस्तांची एकूण संख्या 15 लाख 54 हजार 389 इतकी झाली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या