Saturday, September 14, 2024
Homeमुख्य बातम्यामहाराष्ट्र सदन प्रकरणी दोषमुक्तीसाठी भुजबळांची न्यायालयात याचिका

महाराष्ट्र सदन प्रकरणी दोषमुक्तीसाठी भुजबळांची न्यायालयात याचिका

मुंबई :

- Advertisement -

महाराष्ट्र सदन (maharashtra sadan)आर्थिक घोटाळा प्रकरणात छगन भुजबळ (chhagan bhujbal)यांनी दोषमुक्तीसाठी कोर्टात अर्ज सादर केला आहे. आपल्याविरोधात याप्रकरणी लावण्यात आलेले आरोप हे निराधार असून ते रद्द करण्याची मागणी भुजबळांनी मुंबई सत्र न्यायालयाकडे केली आहे. छगन भुजबळ (chhagan bhujbal)यांच्यासह त्यांचे पुतणे समीर भुजबळ (samir bhujbal)यांनी दोषमुक्तीसाठी कोर्टापुढे अर्ज सादर केला आहे.

सोने तब्बल दहा हजारांनी स्वस्त? गुंतवणुकीची सुवर्ण संधी आहे का?

महाराष्ट्र सदन (maharashtra sadan)प्रकरणातील पाच आरोपींना नुकतंच दोषमुक्त करताना कोर्टानं तपासअधिकाऱ्यांवर चांगलेच ताशेरे ओढले होते. याप्रकरणात गुन्हा नोंद करताना तांत्रिक बाबींची जाण नसतानाही एसीबीच्या तपास अधिकाऱ्यांनी बेजबाबदारपणे आणि बेकायदेशीरपणे कारवाई केल्याचा ठपकाही कोर्टाने आपल्या निकालात ठेवला आहे. या प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयानं नुकतीच पाच जणांची निर्दोष मुक्तता केली आहे. ज्यात विकासक चमणकर कुटुंबियातील प्रविणा चमणकर, प्रणिता चमणकर, प्रसन्न चमणकर, कृष्णा चमणकर यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागातील अभियंता अरूण देवधर यांचा समावेश आहे.

काय आहे प्रकरण

दिल्लीत महाराष्ट्र सदन (maharashtra sadan)प्रकरणात छगन भुजबळ (chhagan bhujbal)यांनी विविध कंपन्यांच्या माध्यमातून साडे तेरा कोटींची लाच घेतल्याचा आरोप लाचलुचपत प्रतिबंधक(acb) विभागाच्या आरोपपत्रात करण्यात आला होता. २० हजार पानांच्या या आरोपपत्रात ६० साक्षीदार होते. या आरोपपत्राचा आधार घेऊन सक्तवसुली संचालनालयाने कारवाई केली होती. भुजबळ यांनी महाराष्ट्र सदनचे बांधकाम मे. के. एस चमणकर या कंपनीला मिळवून दिले. यासाठी भुजबळांनी कंपनीच्या अनुकूल शासकीय निर्णय घेतले. प्रादेशिक परिवहन विभागाने मे. चमणकर यांना निविदा देण्यास नकार दिला. तरीही भुजबळांनी (chhagan bhujbal) परिवहन विभागाकडून मे. चमणकर यांनाच काम मिळेल, अशी व्यवस्था केली. याद्वारे भुजबळांनी विकासकाला २० टक्क्यांऐवजी ८० टक्के नफा देखील मिळवून दिल्याचा आरोप भुजबळांवर आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या