Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्रकेंद्रानंतर राज्य मंत्रिमंडळात बदलाचे वारे, या दोन मंत्र्यांना धोका

केंद्रानंतर राज्य मंत्रिमंडळात बदलाचे वारे, या दोन मंत्र्यांना धोका

मुंबई:

केंद्रीय मंत्रीमंडळानंतर (central Cabinet) आता राज्याच्या मंत्रीमंडळात (state cabinet) लवकरच बदल (Change) होणार आहे. यात काँग्रेसच्या (Congress) दोन मंत्र्यांना (ministers) नारळ दिला जाण्याची शक्यता आहे. यात एका राज्यमंत्र्यांचा देखील समावेश आहे.

- Advertisement -

photo : पंढरीत विठुनामाचा गजर ! शासकीय महापुजेचे खास फोटो

नव्या फेरबदलात काँग्रेसकडून मत्स्य व्यवसाय मंत्री अस्लम शेख (aslam shaikh)आणि आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी (k c padawi) यांना डच्चू मिळण्याची शक्यता आहे. तर, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कोट्यातील प्रत्येकी एक जागा भरण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. कोल्हापूरचे पालकमंत्री आणि काँग्रेस नेते सतेज पाटील (Congress Satej Patil) यांना मंत्रिमंडळात बढती (Thackeray Govt reshuffle ) मिळण्याची शक्यता आहे. सतेज पाटील यांच्याकडे सध्या गृहराज्य मंत्रिपद (Minister of State Home) आहे. मात्र त्यांना आता काँग्रेसकडून कॅबिनेट मंत्री म्हणून बढती दिली जाऊ शकते.

शिवसेनेचे आमदार संजय राठोड आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी मंत्रिपदाचे राजीनामे दिले आहेत. त्यामुळे दोन्ही पक्षांची एक एक जागा रिक्त झाली आहे. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून ही जागा भरण्यात येणार आहे. त्यासाठी दोन्ही पक्षात मंत्रिपद मिळावं म्हणून जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. मात्र, पक्ष श्रेष्ठी कुणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ टाकणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना मंत्री पद मिळणार का, याबाबत चर्चा आहे. पण पटोले यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचे काम करुन पक्ष बांधणीस हातभार लावावा असे काँग्रेसच्या नेत्यांन वाटत आहे. दुसरीकडे समाधानकारक नसणाऱ्या मंत्र्यांना वगळण्याचं काँग्रेसमध्ये घटत आहे. त्यामुळे अस्लम शेख आणि केसी पाडवी यांना काँग्रेसकडून डच्चू दिला जाऊ शकतो, असं सूत्रांनी सांगितलं.

नाना पटोले दिल्लीत

राज्यात फेरबदलाचे संकेत मिळत असतानाच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले दिल्लीत गेले आहेत. ते आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेणार आहेत. त्यामुळे उलट सुलट चर्चांना उधाण आले आहे. सध्या काँग्रेसच्या वाट्यात असलेल्या मंत्रिपदांमध्ये पश्चिम महाराष्ट्रात केवळ एक मंत्रिपद दिलं आहे. पश्चिम महाराष्ट्रात बाळासाहेब थोरात वगळता दुसरा कॅबिनेट मंत्री नसल्यानं सतेज पाटील यांचं नाव आघाडीवर आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील सतेज पाटील यांच्या कामाचं कौतुक केलं होतं.

असे आहे महाविकास आघाडीचे वाटप

ठाकरे सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार डिसेंबर 2019 मध्ये झाला होता. त्यावेळी विस्तारामध्ये राष्ट्रवादीला 14 (10 कॅबिनेट आणि 4 राज्यमंत्रिपदं), शिवसेनेला 12 (8 कॅबिनेट आणि 4 राज्यमंत्रिपदं), तर काँग्रेसला 10 (8 कॅबिनेट आणि 2 राज्यमंत्रिपदं) मिळाली होती. सध्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस यांचे अनुक्रमे 15-13-12 अशी मंत्रिपदं आहेत.ल

- Advertisment -

ताज्या बातम्या