Thursday, July 4, 2024
HomeराजकीयVidhan Parishad Election : महायुतीचे टेन्शन वाढले; निवडणुकीत होणार तगडी फाईट

Vidhan Parishad Election : महायुतीचे टेन्शन वाढले; निवडणुकीत होणार तगडी फाईट

'हे' उमेदवार रिंगणात

मुंबई | Mumbai

- Advertisement -

विधान परिषदेच्या (Vidhan Parishad) ११ जागांसाठी १२ जुलै रोजी मतदान होणार असून आज दुपारपर्यंत उमेदवारी अर्ज करण्याचा शेवटचा दिवस होता. यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीतील (Mahayuti and Mahavikas Aaghdi) घटक पक्षांच्या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे विधानपरिषद निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून ११ जागांसाठी १२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

हे देखील वाचा : नाशिक शिक्षक मतदारसंघात किशोर दराडे विजयी

विधानसभेतील संख्याबळाच्या आधारे भाजपचे ५, एकनाथ शिंदेंची शिवसेना २, अजित पवारांची राष्ट्रवादी २ तर महाविकास आघाडीतील कॉंग्रेसचा १ उमेदवार आणि अजून एक जागा निवडून येऊ शकतो. मात्र, ठाकरेंच्या शिवसेनेने देखील एक उमेदवार दिल्याने विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी १२ उमेदवार जण मैदानात आहेत. त्यामुळे निवडणुकीत (Election) मोठा ट्विस्ट आला असून मते फुटण्याच्या भीतीने महायुतीचे टेन्शन वाढल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

हे देखील वाचा : मोठी बातमी! विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचे निलंबन; सभागृहात लाड यांना शिवीगाळ करणे भोवले

विधान परिषदेसाठी महायुतीमधील भाजपने पकंजा मुंडे, योगेश टिळेकर,डॉ. परिणय फुके,अमित गोरखे आणि सदाभाऊ खोत यांना उमेदवारी दिली आहे.तर शिंदेंच्या शिवसेनेने दोन माजी खासदारांना उमेदवारी जाहीर केली आहे. यात
यवतमाळ-वाशिमच्या माजी खासदार भावना गवळी आणि रामटेकचे माजी खासदार कृपाल तुमाने यांच्या नावांचा समावेश आहे. तसेच अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर यांना संधी देण्यात आली आहे.

हे देखील वाचा : ४० रुपये दर द्या, अन्यथा मुंबईला जाणारा दूध, भाजीपाल्याचा पुरवठा रोखू; राजू शेट्टींचा सरकारला इशारा!

दुसरीकडे महाविकास आघाडीतील ठाकरेंच्या शिवसेनेने (Thackeray Shivsena) पक्षाचे सचिव मिलिंद नार्वेकर यांना उमेदवारी दिली आहे. तर कॉंग्रेसने (Congress) दिवंगत माजी खासदार राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांना संधी दिली आहे. तसेच शरद पवारांच्या राष्ट्र्वादीने शेकापच्या जयंत पाटील (Jayant Patil) यांना पाठिंबा जाहीर करत उमेदवारी दिली आहे. त्यामुळे आता विधानपरिषदेच्या निवडणुकीत मते फुटण्याची शक्यता आहे.

हे देखील वाचा : पावसाने पुन्हा जोर धरला! अनेक भागांसाठी अलर्ट जारी

विधानपरिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला आपला तिसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी आठ मतांची आवश्यक आहे. त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार मिलिंद नार्वेकरांसाठी महायुतीमध्ये क्रॉस व्होटिंग होण्याची शक्यता आहे. सध्या ठाकरेंच्या शिवसेनेचे १५ आमदार असून निवडून येण्यासाठी २३ मते आवश्यक आहेत. तसेच कॉंग्रेसच्या प्रज्ञा सातव यांना निवडून आणण्यासाठी काँग्रेसकडे ३६ मते आहेत. यातील काँग्रेसची २४ मते प्रज्ञा सातव यांना दिली गेली, तर त्यांच्याकडे १२ मते शिल्लक राहतात.ही मते आणि राष्ट्रवादी काँग्रेसची मते मिळून शेकापचे जयंत पाटील निवडून येऊ शकतात. त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर यांना निवडून येण्यासाठी ८ मते कमी पडतात.

हे देखील वाचा : Nashik Crime News : शेअर ट्रेडिंगमधील नफ्याचे आमिष दाखवून ३७ लाख रुपये उकळले

दरम्यान, मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) हे उद्धव ठाकरेंच्या जवळचे म्हणून ओळखले जातात.तसेच त्यांचे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह शिंदेंच्या शिवसेनेच्या आमदारांशीही चांगले संबंध आहे. याशिवाय भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्याशीही नार्वेकरांचा चांगला सुसंवाद आहे.त्यामुळे महायुतीतील काही आमदार क्रॉस व्होटिंग करण्याची शक्यता असल्याची चर्चा दबक्या आवाजात राजकीय वर्तुळात सुरू आहे. विशेष बाब म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील आणि शिंदेंच्या शिवसेनेतील काही आमदार ठाकरे आणि पवारांच्या पक्षात येण्यास इच्छुक असल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळे या निवडणुकीत महाविकास आघाडीचा तिसरा उमेदवारही निवडून आल्यास महायुतीसाठी हा मोठा धक्का असू शकतो.

व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या