Sunday, May 19, 2024
Homeमुख्य बातम्याVidhan Sabha Monsoon Session : पावसाळी अधिवेशनात 'हे' मुद्दे गाजणार

Vidhan Sabha Monsoon Session : पावसाळी अधिवेशनात ‘हे’ मुद्दे गाजणार

मुंबई | Mumbai

उद्या सोमवार पासून (दि.१७ ) राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. यंदाचे विधामंडळाचे पावसाळी अधिवेशन लक्षवेधी ठरण्याची शक्यता आहे, कारण याआधी विरोधी पक्षनेते असलेले राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि त्यांचे समर्थक आमदार हे आता सत्तेत सहभागी झाले आहेत. हे पावसाळी अधिवेशन विरोधक की सत्ताधारी यापैकी नेमकं कोण गाजवणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच राष्ट्रावदीत काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यानंतर राष्ट्रवादीकडे असलेल्या विरोधी पक्षनेतेपदावर काँग्रेसकडून दावा केला जाऊ शकतो. त्यामुळे सत्ताधारी पक्ष विरोधकांच्या प्रश्नांना कशी उत्तरे देतील हे पाहाणे महत्वाचे ठरणार आहे.

- Advertisement -

जुलैचे पंधरा दिवस लोटले तरी महाराष्ट्रातील अनेक भागांत अजूनही पाऊस नाही, धरणे कोरडीठाक पडली असून पेरण्या रखडल्या आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. महिला अत्याचाराचे वाढते प्रकार, वाढलेले जातीय तणाव, महागाई, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबल्याने खोळंबलेली विकासकामे या मुद्यांवर सरकारला घेरण्याची रणनीती महाविकास आघाडीने आखली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि काँग्रेस या महाविकास आघाडीच्या पक्षांची एकजूट शिंदे, फडणवीस व अजितदादांना कसे घेरणार याकडे लक्ष असणार आहे.

सचिन तेंडुलकरांच्या ‘या’ कृत्यावर बच्चू कडूंचा थेट आक्षेप; लिहिलं खुलं पत्र

विरोधक या मुद्द्यांवर सरकारला घेरणार

  • लांबलेला पाऊस, दुबार पेरणीचे संकट, बोगस बियाणे, शेतकऱयांना मिळणारी अपुरी मदत

  • कोयता गँगची वाढती दहशत, महिला अत्याचाराच्या वाढत्या घटना

  • महसूल व शिक्षकांच्या बदल्यांमधील भ्रष्टाचार, मंत्री अब्दुल सत्तार, संजय राठोड यांचे घोटाळे

  • महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात उष्माघातामुळे गेलेल्या बळींबाबत चौकशीत चालढकल

  • मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावरील वाढते अपघात

  • राज्यातील वाढती बेकारी आणि राज्याबाहेर जाणारे उद्योग

दरम्यान, अजित पवार सत्तेत गेल्याने राज्यात प्रथमच दोन उपमुख्यमंत्री पदे निर्माण झालेली आहेत. त्यामुळे या अधिवेशनात दोन उपमुख्यंत्र्यांसाठी दोन आसने निर्माण करावी लागतील. उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री अजित पवार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा ज्येष्ठ आहेत, पण देवेंद्र फडणवीस हे माजी मुख्यमंत्री असल्याने त्यांची आसन व्यवस्था मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शेजारी असणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या