Monday, October 21, 2024
Homeब्रेकिंग न्यूजमहायुतीत वादाची ठिणगी; नांदगावची जागा राष्ट्रवादीला सोडण्याची मागणी, कार्यकर्ते अजितदादांच्या भेटीला

महायुतीत वादाची ठिणगी; नांदगावची जागा राष्ट्रवादीला सोडण्याची मागणी, कार्यकर्ते अजितदादांच्या भेटीला

मुंबई | Mumbai

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी (Vidhansabha Eelction) महायुतीमधील (Mahayuti) घटक पक्ष असणाऱ्या भाजपने काल (दि.२०) रविवारी ९९ उमेदवारांची यादी (Candidate List) जाहीर केली. त्यानंतर आज सोमवारी (दि.२१) रोजी अजित पवार गटाची (Ajit Pawar NCP) आणि शिंदेंच्या शिसेनेतील यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीतून नेमकी कुणाला उमेदवारी मिळते याकडे, सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, उमेदवार यादी जाहीर होण्याआधीच महायुतीमध्ये नाशिक जिल्ह्यातील नांदगाव विधानसभा मतदारसंघावरून ठिणगी पडली आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : शरद पवारांच्या राष्ट्र्वादीच्या उमेदवारांची संभाव्य यादी समोर; कोण कुठून लढणार?

महायुतीमध्ये नांदगाव विधानसभेची जागा शिंदेंच्या शिवसेनेकडे असून या ठिकाणी सुहास कांदे (Suhas Kande) आमदार आहेत. मात्र आता या जागेवर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने दावा सांगितला आहे. या मतदारसंघातून राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ (Sameer Bhujbal) लढण्यासाठी इच्छुक आहेत. या पार्श्वभूमीवर आज नांदगाव- मनमाड मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मुंबईत अजित पवारांच्या देवगिरी या निवासस्थानी भेट घेतली.यावेळी कार्यकर्त्यांनी भुजबळ साहेब आगे बढो, हम तुम्हारे साथ है या घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता. तसेच पक्ष सोडू देखील आपण सुहास कांदेचे काम करणार नाही ,अशी भूमिकाही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी घेतली आहे.

हे देखील वाचा : मोठी बातमी! भाजपची पहिली यादी जाहीर; ‘यांना’ मिळाली संधी

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची भेट घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसला ही जागा देण्यात यावी या मागणीसाठी जवळपास ४०० ते ५०० कार्यकर्ते देवगिरी या निवासस्थानी दाखल झाले आहे. नांदगावची जागा राष्ट्रवादीला मिळावी अथवा शिवसेनेने (Shivsena) उमेदवार बदलावा अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे.पंरतु, शिंदेंच्या शिवसेनेचा उमेदवार दिला गेला तर त्यांच्या उमेदवाराचे काम करणार नाही, असेही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी म्हटले आहे.

हे देखील वाचा : Political Special : दिंडोरी-पेठ मतदारसंघात पक्षापेक्षा गटा-तटाकडे निवडणुकीची वाटचाल?

समीर भुजबळ ठाकरे आणि शरद पवार गटातील नेत्यांच्या संपर्कात

सध्या समीर भुजबळ हे महायुतीकडून उमेदवारी मिळेल या प्रतीक्षेत आहेत. सुहास कांदे हे महायुतीचे उमेदवार असतील अशी चर्चा आहे. मात्र, समीर भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. उमेदवारी न मिळाल्यास भुजबळ इतर पर्यायांचा विचार करणार असल्याचे बोलले जात आहे. तसेच अपक्ष किंवा महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून लढता येईल का याची देखील चाचपणी भुजबळ यांच्याकडून सुरू असल्याचे समजते. याशिवाय ते महाविकास आघाडीतील ठाकरे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या