Wednesday, January 7, 2026
Homeनगरझेडपी, पंचायत समित्यांची अंतिम मतदार यादी १२ नोव्हेंबरला

झेडपी, पंचायत समित्यांची अंतिम मतदार यादी १२ नोव्हेंबरला

अहिल्यानगर (प्रतिनिधी)

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी जाहीर झालेल्या मतदार याद्यांमध्ये मतदारांची नावे दुबार असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याने राज्य निवडणूक आयोगाने मतदार यादी अंतिम करण्याची मुदत १२ नोव्हेंबरपर्यंत वाढविली आहे. यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणूकापूर्वी मतदार याद्यामधील दुबार नावांचा घोळ मिटल्यानंतरच अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

- Advertisement -

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीची रचना, गट-गणांचे आरक्षण, मतदार यादी आणि मतदान केंद्र निश्चित करण्याची प्रक्रिया राबवली जात होती. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी प्रारूप मतदार यादी जाहीर झाली आहे. या प्रारूप यादीत काही मतदारांची नावे दुबार असल्याच्या तक्रारी राज्यभरातून प्राप्त झाल्या होत्या. मतदार यादीत गोंधळ असल्याचा आरोप होत असल्याने या मतदार याद्यांची पडताळणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

YouTube video player

राज्यस्तरावरूनच मतदार याद्यांविषयी ओरड झाल्याने आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी मतदार यादी अंतिम करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने यासंदर्भात २७ ऑक्टोबर रोजी पत्र काढले असून मतदार यादी अंतिम करण्याच्या कार्यक्रमात बदल केला आहे. त्यानुसार ३ नोव्हेंबर रोजी निवडणूक विभाग व निर्वाचक गणांच्या छापील मतदार यादी अधिप्रमाणित करण्याची तारीख आहे. याच दिवशी छापील मतदार याद्या माहितीसाठी ठेवण्यात आल्याबाबतची सूचना प्रसिद्ध केली जाईल. तसेच, १२ नोव्हेंबर रोजी मतदान केंद्रांची यादी व मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. यापूर्वीच्या वेळापत्रकानुसार २७ऑक्टोबर ही अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्याची मुदत होती.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीत मतदारांची दुबार नावे असल्यास आवश्यक कार्यवाही प्राधान्याने करावी, अशी सूचना राज्य निवडणूक आयोगाने दिली आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी जिल्ह्यात ३० लाख ७ हजार ४०४ मतदार आहेत. राज्य निवडणूक आयोगाने मुदतवाढ दिल्याने यादीतील दुबार नावे वगळण्याची प्रक्रिया राबवली जाणार आहे. पंधरा दिवसात किती दुबार नावे कमी होतात, याकडे लक्ष लागले आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसाठी प्रक्रिया सुरू झाल्याने ग्रामीण भागात वातावरण तापत आहे. इच्छुक मंडळी कामाला लागली आहेत. बैठका, भेटीगाठी, कामांचा लेखाजोखा मांडण्यास सुरुवात झाली आहे. आता १२ नोव्हेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार असल्याने या निवडणुकांची अधिसूचना जाहीर होण्यास किमान नोव्हेंबरमधील तिसरा आठवडा उजाडू शकतो.

पालिकानंतरच झेडपी, पंचायत समित्यांची शक्यता

जिल्ह्यात जिल्हा परिषद, १४ पंचायत समित्या आणि ११ पालिका व १ नगर परिषदांसाठी निवडणूक पूर्व तयारी सुरू आहे. यातील कोणत्या निवडणूका आधी होणार याबाबत उत्सूकता असतांना आता दुबार मतदारांच्या नावामुळे जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी कार्यक्रम लांबणार असल्याने जिल्ह्यात आधी पालिका व त्यानंतर जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणूका होणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे.

ताज्या बातम्या

Nashik Accident News : चाचडगाव टोलनाक्याजवळ ईरटीका-स्कॉर्पिओचा भीषण अपघात; चौघे जागीच...

0
दिंडोरी | Dindori तालुक्यातील नाशिक-पेठ रस्त्यावरील (Nashik-Peth Road) चाचडगाव टोलनाक्याजवळ (Chachadgaon Toll Plaza) ईरटीका आणि स्कॉर्पिओचा भीषण अपघात (Ertika-Scorpio Accident) झाल्याची घटना घडली आहे. या...