बारामती | Baramati
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचं वयाच्या ६६ व्या वर्षी काल (बुधवारी) बारामतीमध्ये एका भीषण विमान अपघातात निधन झाले. त्यांच्या अकाली निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्रासह पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
हे देखील वाचा : मोठी बातमी! उपमुख्यमंत्री अजित पवारांचा विमान अपघातात मृत्यू
अजित पवारांच्या पार्थिवावर आज (गुरुवारी) सकाळी 11 वाजता बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. काल (बुधवारी) त्यांचे पार्थिव रात्री १० वाजेपर्यंत विद्या प्रतिष्ठान, विद्या नगरी चौक येथे अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. यावेळी लाखो लोकांनी त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले.
यानंतर अजित पवरांचे पार्थिव पुन्हा बारामतीमधील मेडिकल कॉलेज येथे नेण्यात आले होते. दरम्यान आज (गुरुवारी) सकाळी बारामतीमधील मेडिकल कॉलेज येथून पुन्हा अजित पवारांचे पार्थिव त्यांच्या काटेवाडी येथील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले असून, येथे लोकांनी त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी गर्दी केली आहे.
हे देखील वाचा : Ajit Pawar Death : … अन् ‘त्याच’ घड्याळामुळे पटली अजित पवारांच्या मृतदेहाची ओळख; महाराष्ट्राच्या ‘दादा’ची चटका लावणारी एक्झिट
दरम्यान, थोड्याच वेळात म्हणजे सकाळी ११ च्या सुमारास बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर संपूर्ण शासकीय इतमामात अजित पवारांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. यावेळी त्यांना ‘गार्ड ऑफ ऑनर’ देऊन मानवंदना दिली जाणार आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह दिग्गज नेते अजित पावरांना अंतिम निरोप देण्यासाठी उपस्थित राहणार आहेत.
हे देखील वाचा : Ajit Pawar Death : दमदार आणि दिलदार मित्र सोडून गेला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस





